Friday, April 26, 2024
Homeनगरअकोले शिवसेना पदाधिकार्‍यांनी घेतली पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

अकोले शिवसेना पदाधिकार्‍यांनी घेतली पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुका शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर मागण्यांचे निवेदन दिले.

- Advertisement -

शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद मंडलिक, विभाग प्रमुख बाळासाहेब कुमकर, ज्येष्ठ सरपंच प्रदीप हासे, शर्मिला येवले यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

यावेळी पर्यटनाच्यादृष्टीने आणि अनेक ऐतिहासिक गड, किल्ले, शिखरे, आणि छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आई कळसूबाई शिखर, महाराष्ट्राचे चेरापुंजी समजल्या जाणार्‍या, अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, शिवसेनाप्रमुख यांच्या नावे जमीन असलेल्या अकोले तालुक्यातील पर्यटन विकास करण्यासाठी भरीव निधी देऊन आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या, रस्त्यांची दुरवस्था झालेल्या अकोले तालुक्यात जाणीवपूर्वक लक्ष घालण्यासाठी त्यांना सुचविले. मंत्री आदित्य ठाकरे यांनी अकोले तालुक्यात विशेष लक्ष आणि निधी देण्याचे तसेच आमच्या कुटुंबाचे तेथील मातीशी नाते असल्याचे सांगत लवकरच स्वतः दौरा करण्यासाठी येण्याचे आश्वासन दिले.

नामदार ठाकरे यांच्या अकोले दौर्‍याने तालुक्याच्या पर्यटनाला निश्चित चालना मिळेल, असा विश्वास नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या