Thursday, April 25, 2024
Homeनगरआशा सेविकांचे पंचायत समिती कार्यालयात धरणे आंदोलन

आशा सेविकांचे पंचायत समिती कार्यालयात धरणे आंदोलन

अकोले |प्रतिनिधी| Akole

गेल्या सात महिन्यांपासून आशा सेविकांना त्यांच्या कामाचे मानधन मिळत नसल्याच्या निषेधार्थ अकोले तालुक्यातील आशा सेविकांना आज आठवडे बाजारच्या दिवसापासून पंचायत समिती कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केले आहे. पर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा या आंदोलक आशा सेविकांनी घेतला आहे. आपली लहान मुले घरी ठेऊन या आशा सेविका यांनी हे धरणे आंदोलन सुरू केले असल्याने त्यांच्या प्रश्नी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योग्य तो मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

अकोले तालुक्यात सुमारे 350 आशा सेविका कार्यरत आहेत.आदिवासी, डोंगराळ,दुर्गम व भौगोलिक दृष्ट्या असलेला जिल्ह्यातील हा मोठा तालुका आहे. येथील आशा सेविकांना दरमहा साडे तीन हजार मानधन दिले जात असते. मानधनाच्या तुलनेत या आशा सेविकांना ऊन,वारा, पाऊस या सर्व काळात वाडी वस्ती वर जाऊन नवविवाहिता, गरोदर स्त्रीया, प्रसूती झालेल्या स्रिया, त्यांच्या बालकांची पाच वर्षांपर्यंत  आरोग्य विषयक काळजी घेण्याचे ,माहिती संकलित करण्याचे,सर्व्हे करण्याचे काम करावे लागते.

माकप प्रणित सिटू संघटनेच्या  नेतृत्वाखाली आशा सेविकांनी आज गुरुवार आठवडे बाजारच्या दिवशी आपल्या मानधनासाठी पंचायत समितीच्या कार्यलयातच धरणे आंदोलन सुरू केले आहे. रात्री 10 वाजे पर्यंत तालुक्यातील आरोग्य अधिकारी यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील अन्य कुणीही अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला नसल्याचे आंदोलन कर्त्या आशा सेविकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत आम्हाला आमचे सात महिन्याचे मानधन भेटणार नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा निर्धार या आंदोलक आशा सेविकांनी व्यक्त केला आहे.

माकपचे नेते डॉ अजित नवले,कॉ सदाशिव साबळे यांनी आशा सेविकांचे  या धरणे आंदोलनाला पाठींबा दिला असून ते स्वतःही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.विजयादशमी,दिवाळी हे सण जवळ येऊन ठेपले आहे, जिल्ह्यात सर्व आशा सेविकांचे मानधन दिले जाते परंतु अकोले हा विस्ताराने क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा तालुका असल्याने अकोले पर्यंत हे मानधन येत नसल्याचा कॉ नवले व कॉ साबळे यांचा हा आरोप आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या