Thursday, April 25, 2024
Homeनगरअकोले नगरपंचायतीवर आता प्रशासक राज

अकोले नगरपंचायतीवर आता प्रशासक राज

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगरपंचायतीची मुदत संपल्याने नगरपंचायतीवर आता प्रशासक राज कालपासून सुरु झाले. प्रांताधिकारी डॅा.शशिकांत मंगरुळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

अकोले नगरपंचायतीत २०१५ ते २०२० कार्यकाळातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ काल बुधवार दि २५/११/२०२० रोजी संपुष्टात आला आहे. निवडणुकीनंतर नवीन पदाधिकारी व नगरसेवक यांची पहिली बैठक होई पर्यत नगरपंचायतवर प्रशासक म्हणून प्रांताधिकारी डॅा.शशिकांत मंगरूळे हे काम पाहणार आहेत .

अकोले नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे.नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली असुन प्राथमिक प्रभाग व आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे.या आरक्षण व प्रभाग रचनेवर हरकतीची मुदतही काल गुरूवारी संपली . २४ डिसेंबर २०२० रोजी अंतिम आरक्षण व प्रभाग रचना जाहीरपणे होणार आहे.यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून फेब्रुवारी अथवा मार्च मध्ये सार्वत्रिक निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.

अकोले नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० चे बिगुल वाजले आहे. या निवडणूकीत शहरातील सर्व १७ प्रभागात इच्छुकांची धावपळ सुरु झाली आहे.सर्वच राजकीय पक्षानी निवडणुकीत सद्या तरी स्वबळाचा नारा दिला आहे.

कारण त्यामुळे आपल्या पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवारी देणे शक्य होणार आहे.आघाडी झाली तर मात्र काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाला मात्र इच्छुक उमेदवारांची नाराजी ओढून घ्यावी लागणार आहे.

तसेच स्वबळावर किंवा आघाडी झाल्यावर निवडणूक लढण्याची शक्यता झाली तर नेत्यांच्या मुलांना संधी मिळते की सर्व सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळते यावरही निवडणूक निकाल अवलंबून राहणार आहे.

अर्थात अजून दोन ते तीन महिन्यात बरेच पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच हे स्पष्ट होईप. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप लढणार कि सर्व पक्ष स्वबळावर लढणार ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या