Friday, April 26, 2024
Homeनगरअकोले नगरपंचायत निवडणुकीत अनेक प्रभागांत बहुरंगी लढती

अकोले नगरपंचायत निवडणुकीत अनेक प्रभागांत बहुरंगी लढती

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगरपंचायत निवडणुकीत 13 जागांसाठी 44 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले असून काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढत आहे. राष्ट्रवादी व शिवसेना यांची युती असली तरी या दोन्हीही पक्षांचे अनेक बंडखोर निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे बहुसंख्य प्रभागांत तिरंगी, चौरंगी लढती होणार आहेत.

- Advertisement -

निवडणूक रिंगणातील उमेदवारांना काल मंगळवारी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले व त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.

ओबीसी आरक्षणाचे चार प्रभाग वगळून नगरपंचायत निवडणूक लढवीत असलेले प्रभागनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग क्र 1- मंडलिक अलका अशोक (काँग्रेस), मंडलिक विमल संतु (शिवसेना), मंडलिक सुरेखा पुंजा (राष्ट्रवादी). प्रभाग क्र 2- चौधरी शिवाजी आनंदा (राष्ट्रवादी), चौधरी सागर निवृत्ती(भाजप), चौधरी सागर विनायक(काँग्रेस). प्रभाग 3- नवले जयश्री दत्तात्रय-(मनसे), पांडे मंदा तान्हाजी (राष्ट्रवादी), मनकर प्रतिभा वसंत (भाजप), शिंदे ठकूबाई पोपट(शिवसेना). प्रभाग 5 -कानवडे गणेश भागुजी (शिवसेना), गुजर हर्षल रमेश (मनसे), नाईकवाडी सोनाली लक्ष्मीकांत(भाजप). प्रभाग 6 – घोडके शैला विश्वनाथ (भाजप), रुपवते कांचन किशोर(काँग्रेस), रुपवते श्वेताली मिलिंद (राष्ट्रवादी). प्रभाग 7- ताजणे सचिन सदाशिव(माकप), शेख आरीफ शमसुद्दीन (राष्ट्रवादी), शेख मैनुद्दीन बद्रोद्दीन (भाजप). प्रभाग 8- गायकवाड अशोक दत्तू ( राष्ट्रवादी), गायकवाड जयराम विठोबा-(शिवसेना), गायकवाड योगेश उर्फ शिवाजी ( मनसे), वडजे बाळासाहेब काशिनाथ (भाजप). प्रभाग 9- रोकडे भिमा बबन (राष्ट्रवादी), वैद्य शितल अमोल उर्फ बिबवे शितल मधुकर (भाजप). प्रभाग 10- नाईकवाडी अनिल गंगाधर (भाजप), नाईकवाडी प्रकाश संपतराव(अपक्ष), शेटे नवनाथ विठ्ठल (शिवसेना), शेटे मयूर नामदेव (काँग्रेस), शेणकर संदीप भाऊसाहेब(राष्ट्रवादी). प्रभाग 12- कुरेशी निलोफर गफ्फार (राष्ट्रवादी), जाधव सुमन सुरेश (काँग्रेस), पवार अनिता शरद(शिवसेना), शेख तमन्ना मोसिन (भाजप). प्रभाग क्र 15-नाईकवाडी प्रदीप बाळासाहेब(काँग्रेस), नाईकवाडी संतोष कारभारी (राष्ट्रवादी), वर्पे अजय भीमराज-(शिवसेना), शेटे सचिन संदीप(भाजप). प्रभाग क्र 16-भांगरे पुष्पा शरद(शिवसेना), भांगरे पूजा तुकाराम (राष्ट्रवादी), भांगरे मीना प्रकाश (काँग्रेस), शेणकर माधुरी रवींद्र,(भाजप). प्रभाग क्र 17-पानसरे आशा रवींद्र (राष्ट्रवादी), शेळके कविता परशुराम (भाजप).

- Advertisment -

ताज्या बातम्या