Saturday, April 27, 2024
Homeनगरआम्ही पक्ष बदलणार असल्याच्या वावड्यांवर विश्वास ठेवू नका - नाईकवाडी

आम्ही पक्ष बदलणार असल्याच्या वावड्यांवर विश्वास ठेवू नका – नाईकवाडी

अकोले |प्रतिनिधी| Akole

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य युवक व व्यक्तींना नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी देऊन निवडून आणण्यासाठी दिवस-रात्र कष्ट घेतले.अशा आमच्या नेत्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व नगरसेवक खंबीरपणे उभे राहून वैभवराव पिचड यांना 2024 मध्ये आमदार करू असा आशावाद अकोलेच्या नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी व नगरसेवक यांनी केले. आम्ही पक्ष बदल करणार असल्याच्या वावड्या विरोधी पक्षाकडून उठविल्या जात असून त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisement -

माजी आमदार वैभव पिचड यांचे खंदे समर्थक, ज्येष्ठ नेते हे वैभव पिचड यांची साथ सोडणार असल्याची व त्यांच्याबरोबर भाजपचे काही नगरसेवकही जाणार असल्याची जोरदार चर्चा चालू असून आम्ही भाजप व वैभव पिचड यांना सोडणार असल्याच्या वृत्ताचे खंडन करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सर्व नगरसेवकांनी आपली भूमिका स्पस्ट करताना आपण भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.

यावेळी नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी म्हणाल्या की, माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्यावर विश्वास ठेवून तालुक्यात सत्ता नसताना अकोलेकरांनी आम्हाला निवडून दिले.आम्ही भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलो आहेत.त्या मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.शहरातील सर्व विकास कामे एकजुटीने मार्गी लावू.

आरोग्य विभागाचे सभापती शरद नवले म्हणाले की, माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला उमेदवारी मिळू नये म्हणून काहींनी प्रयत्न केले. मला निवडणुकीत खूप त्रास दिला मात्र मधुकरराव पिचड व वैभव पिचड यांनी स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक मतदारांशी संपर्क ठेवून मला निवडून दिले.त्यांना आम्ही कधीही दगा देणार नाही. विरोधकांनी खोट्या वावड्या उठविण्याचे बंद करावे.

पाणीपुरवठा विभागाचे सभापती हितेश कुंभार म्हणाले, कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच वैभव पिचड यांना 2024 मध्ये आम्ही आमदार करणारच असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बांधकाम विभागाच्या सभापती वैष्णवी धुमाळ, नगरसेविका शीतल वैद्य, कविता शेळके, माधुरी शेणकर, जनाबाई मोहिते, तमन्ना. शेख, नगरसेवक सागर चौधरी यांनी आम्ही शेवटपर्यंत माजीमंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्याबरोबर आहोत, पुढेही राहू. त्यांना आम्ही कधीही सोडणार नाही, पक्ष बदल करणार नाही अशी ग्वाही दिली.

अनुपस्थित असलेल्यांविषयीही गैरसमज नको

उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे हे कामानिमित्त बाहेर गावी गेले आहेत व महिला बाल कल्याण समितीच्या सभापती प्रतिभाताई मनकर तीन दिवसांपासून बाहेरगावी गेलेल्या आहेत. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. ते कोठेही पक्ष बदलून जाणार नाही, ते भाजप व पिचड यांच्याबरोबरच आहेत. त्यांच्याविषयी कोणीही गैरसमज करून घेऊ नये असे नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी व सभापती हितेश कुंभार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या