Friday, April 26, 2024
Homeनगरअकोले बाजार समिती निवडणुकीत भाजप-महाविकास आघाडीत सरळ लढत

अकोले बाजार समिती निवडणुकीत भाजप-महाविकास आघाडीत सरळ लढत

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ आणि आ. डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळ यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. शेतकरी विकास मंडळाच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या असून आता 15 जागांसाठी 34 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

- Advertisement -

बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या 18 जागांसाठी 159 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यात सहकारी संस्था मतदार संघात 93, ग्रामपंचायत मतदार संघासाठी 48, व्यापारी मतदार संघासाठी 14 तर हमाल मापाडी मतदार संघासाठी 4 उमेदवारी अर्जांचा समावेश होता. आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. माजी आमदार वैभव पिचड यांनी शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांची घोषणा केली.

भाजप कार्यालयात माजी मंत्री मधुकरराव पिचड, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, सीताराम देशमुख, सुरेश खांडगे, डॉ. विजय पोपेरे, सोमनाथ मेंगाळ, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, अ. ता. एज्यु. सोसायटी चे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, अगस्ति कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश नवले, अमृतसागर दूध संघाचे संचालक आनंदराव वाकचौरे, आप्पासाहेब आवारी, माजी सरपंच संदीपराव शेटे, माजी संचालक रावसाहेब खरात, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहूल देशमुख, भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे आदींची उपस्थिती होती.

शेतकरी विकास मंडळाने 3 जागा बिनविरोध जिंकत यशाकडे वाटचाल सुरू केली आहे. तर विरोधी शेतकरी समृद्धी मंडळाच्या उमेदवारांची घोषणा आ. डॉ. किरण लहामटे यांनी केली. यावेळी अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, मिनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड. वसंतराव मनकर, परबत नाईकवाडी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेशराव नवले, तालुका प्रमुख डॉ. मनोज मोरे, ज्येष्ठ नेते मच्छिंद्र धुमाळ, भाकपचे ज्येष्ठ नेते कारभारी उगले हे उपस्थित होते.

समृद्धी मंडळाला तीन जागांवर उमेदवार मिळू शकले नाही त्यामुळे 15 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

शेतकरी विकास मंडळाचे अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे- सोसायटी मतदार संघ- किरण प्रकाश देशमुख, सुनील रोहिदास रंधे, कैलास गंगाधर कानवडे, अशोक कारभारी उगले, रामनाथ नागू भांगरे, शिवनाथ विठ्ठल आरज, रावसाहेब विठ्ठल वाळुंज.

इतर मागास प्रवर्ग – बाळासाहेब गणपत सावंत

महिला राखीव – नंदा सदाशिव कचरे, मंदा गणपत बराते, ग्रामपंचायत सर्वसाधारण-अर्जुन दत्तु गावडे, संतोष रामनाथ तिकांडे.

दुर्बल घटक – केशव अर्जुन बोडके

व्यापारी मतदार संघ – अब्दुल मोहम्मद इनामदार, किरण हरिभाऊ कानकाटे, भटक्या विमुक्त जाती-जमाती-चक्रधर सदगीर( बिनविरोध).

हमाल मापाडी मतदार संघ- मारुती परशराम वैद्य (बिनविरोध)

अनुसूचीत जाती जमाती- तुकाराम सोमा खाडे (बिनविरोध),

शेतकरी समृद्धी मंडळाचे मतदार संघ निहाय उमेदवार पुढील प्रमाणे- सोसायटी मतदार संघ -भास्कर बाळाजी खांडगे, राम बन्सी सहाणे, सचिन हौशिराम रंधे, ईश्वर सोमनाथ वाकचौरे, रुपा धोंडिबा कचरे, रोहिदास जिजाबा भोर, योगेश गजानन आरोटे,

सोसायटी मतदार संघ- महिला राखीव- स्वाती तुकाराम कोरडे, मंगल अनिल भांगरे

इतर मागास प्रवर्ग- विकास आत्माराम बंगाळ

ग्रामपंचायत मतदार संघ – रामकृष्ण अण्णासाहेब आवारी, भाऊसाहेब पाडुरंग नाईकवाडी

दुर्बल घटक – भानुदास बोल्हाजी तिकांडे.

व्यापारी मतदार संघ – मंगेश सुनील नवले, नवनाथ नाना वाळुंज.

याव्यतिरिक्त सर्वसाधारण सोसायटी मतदार संघातून निंबा सखाराम बुळे, भाऊसाहेब आनंदा भांगरे, भाऊसाहेब महादू शेणकर, इतर मागासवर्गीय मतदार संघातून सुमिरन विलास मालुंजकर हे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारी जाहीर करतांना अचानकपणे सोसायटी सर्वसाधारण मतदार संघातून बाजार समितीचे माजी सभापती रावसाहेब वाळुंज यांचे नाव घोषित करण्यात आले. यावेळी माजी आमदार पिचड यांनी त्यांचा गट यापुढे आपल्यासोबत काम करण्यास इच्छुक असल्याने त्यांना ही उमेदवारी देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी या घोषणेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या