Saturday, April 27, 2024
Homeनगरअकोलेत दोन दिवसांत 40 करोना बाधित

अकोलेत दोन दिवसांत 40 करोना बाधित

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. करोनाची सुरुवात झाल्यापासून ते आत्तापर्यंत सर्वाधिक अशा 22 रुग्णांची स्वातंत्र्य दिनी तर काल रविवारी 18 अशा 40 रुग्णांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील रुग्ण संख्या 299 वर जाऊन पोहचली आहे.

- Advertisement -

शनिवारी सकाळी अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 15 व खाजगी प्रयोगशाळेतील 04 व्यक्ती असे 19 जण करोना बाधित आढळून आले होते. रात्री त्यात आणखी तीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे दिवसभरात 22 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 281 वर पोहचली आहे.

खानापूर येथील कोव्हिड सेंटरमध्ये 130 व्यक्तींच्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन करोना टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 15 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील कारखाना रोड येथील 42 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय तरुण,12 वर्षीय युवती, मनोहरपूर येथील 40 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय तरुण, 34 वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथील 51 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला 8 वर्षीय मुलगा, कळस येथील 30 वर्षीय तरुण, देवठाण येथील 85 वर्षीय वृद्ध, व कोतूळ येथील 41 वर्षीय पुरूष, 23 वर्षीय पुरूष, 95 वर्षीय महिला अशा 15 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालांत धामणगाव आवारी येथील 44 वर्षीय पुरूष, परखतपूर येथील 39 वर्षीय पुरूष, ब्राम्हणवाडा येथील 35 वर्षीय पुरुष व कोतूळ येथील 40 वर्षीय पुरुष अशा चार व्यक्तींचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आल्यानंतर रात्री पुन्हा शहरातील पोष्ट ऑफिस जवळील 30 वर्षीय तरुण, कोतूळ येथील 41 वर्षीय पुरुष, व घोडसरवाडी (समशेरपूर) येथील 58 वर्षीय पुरूष अशा प्रकारे काल एकाच दिवसात तालुक्यात 22 जण करोना बाधित आढळून आले. अकोले तालुक्यात रविवारी रॅपिड अ‍ॅन्टीजेनमध्ये 15, खाजगी प्रयोगशाळेत 02 तर अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील एक असे एकूण 18 करोना बाधित आढळले आहेत.

काल रविवारी सकाळी खानापूर कोव्हिड सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये तालुक्यातील 15 व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये तालुक्यातील कोतूळ येथील तब्बल 08 पॉझिटिव्ह आलेत. यात 61 वर्षीय महिला, 85 वर्षीय महिला, 33 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 13 वर्षीय युवती, 08 वर्षीय मुलगी, 15 वर्षीय युवक, 03 वर्षीय मुलगा, हिवरगाव आंबरे येथील 60 वर्षीय महिला,

50 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, मेहंदुरी येथील 21 वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथील 50 वर्षीय महिला, समशेरपुर येथील 34 वर्षीय पुरुष, कळस येथील 29 वर्षीय महिला अशा 15 व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात घोडसरवाडी (समशेरपुर) येथील 61 वर्षीय पुरूष, 58 वर्षीय महिला व अहमदनगर येथील प्रयोगशाळेतील अहवालात मनोहरपूर येथील 60 वर्षीय पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे काल दिवसभरात 18 व्यक्ती करोना बाधित आढळले आहेत.

तालुक्यातील एकूण संख्या 299 झाली आहे. त्यापैकी 198 व्यक्ती करोनामुक्त झाले. 94 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत तर 7 व्यक्ती मयत झालेल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या