अकोले शहराची प्रभाग रचना चुकीची

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगरपंचायतच्या निवडणुकीकरिता नगरपंचायतीची प्रभाग रचना ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे.

शासन आदेशानुसार प्रभाग रचना ही उत्तर पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग क्रमांक देत गेले पाहिजे परंतु तसे न होता प्रभाग पश्चिमेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून दक्षिणेकडे पडलेले आहेत. ते राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरुद्ध आहेत.

अकोले नगरपंचायतीच्या प्रभागांच्या सीमा रेषांचे वर्णन उत्तर पूर्व दक्षिण व पश्चिम अशा दिशा नमूद करून वर्णन केलेले असायला पाहिजे होते तसे झालेले नाही, 2011 ची जनगणना लक्षात घेऊन प्रगणक गट 36 तयार करण्यात आले त्यानुसार अकोले शहराचा नकाशा तयार न होता महसुली नकाशावरून प्रभाग रचना कऱण्यात आलेली आहे.

त्यामुळे प्रगणक गट हे प्रभाग रचनेत सलग न होता सीमा रेषेचा विचार करून सलग असणे आदेशानुसार क्रमप्राप्त होते परंतु तसे झालेले नाही, प्रभाग रचना करताना प्रभागाची लोकसंख्या सरासरी लोकसंख्येच्या जवळपास असली पाहिजे असे आदेशात नमूद असतानाही एकही प्रभागात लोकसंख्या सरासरीच्या जवळपास दिसत नाही इतके सर्व दोष अकोले नगरपंचायतच्या येणार्‍या निवडणुकीच्या वेळेस असणार आहेत,

त्यामुळे निवडणूक आयोगाने जाणीव पूर्वक लक्ष घालून पुढील निवडणुकीचा कार्यक्रम हाती घ्यावा, अशी विनंती तसे न झाल्यास याचे परिणाम अकोले शहराच्या विकासावर झालेले आहेत, प्रभागांचा असमतोल असल्याने प्रभाग निहाय निधीचे समान वाटप होऊ शकत नाही.

पाच वर्षे पूर्ण होत आले तरी नगरपंचायत प्रशासन गटारी, सांडपाणी, चिखलमय रस्ते, या पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या धोरणापलीकडे जाऊ शकलेले नाहीत, अनेक विकासाची कामे वॉर्डनिहाय प्रभाग रचना चुकीची झाल्यामुळे संपूर्ण अकोले शहराच्या विकासाला खीळ बसली आहे, या संदर्भात जागरूक नागरिक म्हणून आवाज उठवून या समस्येवर उपाययोजना व्हावी याकरिता, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे यांना भेटून या प्रकरणाला वाचा फोडणार आहोत.

सदर विषय प्रशासनाने गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास अकोले शहरातील नागरिकांच्या उग्र असंतोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल व वेळप्रसंगी खंड पिठातही जनहित याचिका दाखल करू याची नोंद घ्यावी, असा इशारा संपतराव नाईकवाडी, शिवाजी नेहे, गणेश कानवडे, आरीफ तांभोळी, निखिल जगताप, संदीप शेणकर, डॉ. निवृत्ती नाईकवाडी, दिलीप शहा, अक्षय आभाळे, हितेश कुंभार, प्रदीपराज नाईकवाडी, शब्बीर शेख, बाळासाहेब धुमाळ, भास्कर मंडलिक,

शिवाजी चौधरी, बाळासाहेब पानसरे, हेमंत दराडे, बाळासाहेब राऊत, प्रल्हाद भालेराव, जयराम गायकवाड, संतोष नाईकवाडी, हैदर पठाण, अजीम सय्यद, अजय वर्पे, रामदास शेटे, परवेज शेख, रणजित शिंदे, मन्सूर सय्यद, अनिल जाधव, रोहिदास मोहिते, भागवत शेटे आदी नागरिकांनी दिला आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *