Friday, April 26, 2024
Homeनगरअकोले बाजार समितीत कांदा 2211 रुपये क्विंटल

अकोले बाजार समितीत कांदा 2211 रुपये क्विंटल

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Akole Agricultural Produce Market Committee) काल दि. 8 जुलै 2021 रोजी 1449 गोणी कांदा आवक (Onion inward) झाली. एक नंबर कांद्यास 2211 रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला. (market price) नं.1 रु 1851 ते 2211, न.2 ला रु. 1601 ते 1851, नं. 3 ला रु. 1001 ते 1601, गोल्टी रु. 800 ते 1400, खाद रु.200 ते 451 प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत.

- Advertisement -

अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव (Auction) होत आहेत. शेतकर्‍यांनी आपला कांदा (Onion) योग्य बाजारभाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळवून, निवड करून बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा.

बाजार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करणे (Sanitize), नाकाला व तोंडाला मास्क लावणे (Mask Use), बाजार आवारात कुणीही थुंकू नये, सोशल डिस्टनसिंग (Social Distance) या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या