Thursday, April 25, 2024
Homeनगरअकोले : 11 ग्रामपंचायती बिनविरोध

अकोले : 11 ग्रामपंचायती बिनविरोध

अकोले (प्रतिनिधी) –

अकोले तालुक्यातील 52 पैकी 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 41 ग्रा पं च्या 285 जागासाठी 566 उमेदवार

- Advertisement -

निवडणूक रिंगणात उतरले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काल शेवटच्या दिवशी 345 उमेदवारांनी माघार घेतली. 181 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

सुगाव खुर्द- 7 जागा,25 अर्ज दाखल त्यापैकी 15 उमेदवारांनी माघार, 3 जागा बिनविरोध तर 7 जण निवडणूक रिंगणात आहेत. आंबड 10 जण माघार, 18 जण निवडणूक रिंगणात आहेत. कळस बुद्रुक 10 जण माघार तर 28 उमेदवार रिंगणात. लिंगदेव येथे 9 माघार तर 21 रिंगणात, उंचखडक बुद्रुक 10 माघार,16 निवडणूक रिंगणात. ढोकरी 19 माघार तर 18 रिंगणात. धामणगाव आवारी 23 जण माघार तर 25 जण रिंगणात व 2 बिनविरोध. टाकळी-7 माघार,19 रिंगणात. ब्राम्हणवाडा 6 माघार, 28 रिंगणात. गणोरे-20 माघार, 27 रिंगणात. धुमाळवाडी-24 माघार, 16 रिंगणात तर 4 बिनविरोध. कोतुळ-20 माघार, 40 रिंगणात. नवलेवाडी 4 माघार, 7 रिंगणात तर 7 बिनविरोध. मेहेंदुरी 12 माघार,24 रिंगणात. रुंभोडी 15 माघार, 7 रिंगणात तर 8 बिनविरोध. पिंपळदरी 5 माघार 4 रिंगणात 4 बिनविरोध. वीरगाव 10 माघार,22 रिंगणात तर 1 बिनविरोध. वाशेरे-11 माघार तर 11 रिंगणात 1 बिनविरोध. बेलापूर 6 माघार,20 रिंगणात तर 1 बिनविरोध. धामणगाव पाट-4 माघार, 8 रिंगणात, 4 बिनविरोध. कुंभेफळ -17 माघार,13 रिंगणात तर 3 बिनविरोध. तांभोळ-1 माघार,10 रिंगणात तर 4 बिनविरोध.गाव पुढारी विरुद्ध तरुण कार्यकर्ते, सामान्य जनता असा सामना गावोगाव रंगणार असे चित्र पहावयास मिळत आहेत. आजी माजी आमदार हे किती मोर्चे बांधणी करतात यावर पुढची सर्व गणिते अवलंबून आहे.

ज्या ग्रामपंचायत साठी निवडणूका होत आहेत तेथे मोठी रंगत पाहायला मिळणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे . 15 जानेवारीला या ग्रा पं साठी निवडणूक होणार आहे. 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

अकोले तालुक्यातील चितळवेढे, निळवंडे ,कळंब, बहिरवाडी, वाघापूर, उंचखडक खुर्द, निंब्रळ,जाचकवाडी, म्हालादेवी, मोग्रस, मनोहरपूर या 11 ग्रा. पं. बिनविरोध झाल्या. अनेक ठिकाणी गाव पुढार्‍यांनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले मात्र काही अति उत्साही कार्यकर्त्यांमुळे बिनविरोधचे मनसुबे धुळीस मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या