सोलापूर l Solapur
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
या निवडणुकीत जनसेवा संघटनेते नेते धवलसिंह मोहिते पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी लढत पाहायला मिळाली होती. अखेर या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
अकलूज ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपचे विजयसिंह मोहिते-पाटील गटाची सत्ता आली आहे. अकलून ही 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. त्यापैकी 1 जागा बिनविरोध झाली होती. उर्वरित 16 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्यापैकी 13 जागा विजयसिंह मोहिते पाटील गटानं पुन्हा एकदा आपला झेंडा रोवला आहे. मात्र विजयसिंह मोहिते यांचे पुतणे संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपची ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली आहे.