Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयवर्षानंतर अक्कलपाडा पाणी योजना पुर्ण होईल

वर्षानंतर अक्कलपाडा पाणी योजना पुर्ण होईल

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महापालिकेतर्फे कोट्यवधींची कामे भाजपाच्या माध्यमातून झाली आहेत. आम्हाला कामांचा गाजावाजा करण्याची सवय नाही.

- Advertisement -

त्यामुळे कामे जनतेपर्यंत पोहचत नाहीत. एका वर्षानंतर अक्कलपाडा पाणी योजना पुर्ण होवून शहराला दररोज उच्च दाबाने पाणी देणे शक्य होईल. असे महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितले.

महापालिकेची विशेष महासभा आज महापौर चंद्रकांत सोनार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीला आयुक्त अजीज शेख, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री. सोनार म्हणाले की, शहरात 101 कोटींचे रस्ते, भुयारी गटारी योजना, मलनिस्सारन योजना, शहरातील बगीच्यांचे सुशोभीकरण, चौकांचे सुशोभीकरण आदी कामांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर झाला आहे. खराब रस्ते, पाणी समस्या आदींबाबत जनतेचा रोष आहे. तो रास्त आहे. परंतू वर्षानंतर ही परिस्थिती बदलेली राहिल. अशी ग्वाही श्री. सोनार यांनी दिली.

स्थायी समितीने 764 कोटी चार लाख 16 हजाराचे अंदाजपत्रक महापौर सोनार यांच्याकडे सादर केले होते. त्यावर आज चर्चा झाली. नागसेन बोरसे यांनी काही बाबींवर आक्षेप घेतला.

अंदाजपत्रकात अनेक महत्वपुर्ण योजनांचा समावेश केला आहे. त्या योजनांच्या व्यतीरिक्त काही महत्वपुर्ण कामे शहरात केली जाणार आहे. असेही सोनार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या