Thursday, April 25, 2024
Homeनगरकिसान सभेच्या गाव अधिवेशनांना सुरुवात

किसान सभेच्या गाव अधिवेशनांना सुरुवात

अकोले |प्रतिनिधी| Akole

अखिल भारतीय किसान सभेच्या (Akhil Bharatiya Kisan Sabha) गावोगाव शाखा स्थापन करून शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी लढावू एकजूट उभारण्याच्या उद्देशाने अकोले तालुक्यात (Akole Taluka) गाव अधिवेशनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तालुक्यातील डोंगरगाव (Dongargav) येथे किसान सभेचे पहिले गाव अधिवेशन (Convention) पार पडले.

- Advertisement -

कामगार व शेतकर्‍यांचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनात डोंगरगाव किसान सभेसाठी (Dongargav Kisan Sabha) 11 जणांची युनिट कमेटी निवडण्यात आली. डोंगरगाव गाव कमिटीचे अध्यक्ष म्हणून माधव गिर्‍हे, उपाध्यक्षपदी देवराम अगिवले, सचिवपदी दिलीप हिंदोळे, सहसचिव पदी बाळु चिकणे यांची निवड करण्यात आली. किसान सभेच्या जिल्हा समितीच्या वतीने यावेळी कॉ. नामदेव भांगरे, कॉ. अ‍ॅड. ज्ञानेश्वर काकड, कॉ. प्रकाश साबळे, कॉ. राजाराम गंभीरे व डी. वाय. एफ. आय. चे साथी एकनाथ मेंगाळ यावेळी उपस्थित होते.

किसान सभेच्या वतीने अकोले (Akole) संगमनेर (Sangamner), राहुरी (Rahuri) व पारनेर (Parner) तालुक्यांमध्ये गावोगाव गाव अधिवेशनाचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत. अकोले तालुक्यात (Akole Taluka) 64 गावांची निवड करून किसान सभेची गाव अधिवेशने घेत गाव समित्या स्थापन करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांना देश पातळीवर वाचा फोडणार्‍या किसान सभेच्या गावोगाव शाखा सुरू करून शेतकर्‍यांचे स्थानिक प्रश्न धसास लावण्यासाठी या अधिवेशनाचा नक्कीच उपयोग होईल.

वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, शेतकर्‍यांना पूर्ण दाबाने वीज द्या, विजेचा खेळखंडोबा तातडीने थांबवा, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करा, सर्व ग्रामीण जनतेला घरकुल योजनेचा लाभ द्या, निराधार वृद्ध अपंग विधवा परित्यक्ता यांना किमान तीन हजार रुपये पेन्शन द्या व यासारख्या दुधाला किमान 42 रुपये प्रति लिटर भाव द्या, या मागण्यांचे ठराव यावेळी करण्यात येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या