Saturday, April 27, 2024
Homeनाशिकअखिल भारतीय आदिवासी सेनेचे आंदोलन

अखिल भारतीय आदिवासी सेनेचे आंदोलन

इगतपुरी । प्रतिनिधी Igapuri

करोना ( Corona ) महामारीने व वाढत्या महागाईने ( Inflation ) सर्वसामान्य जनतेला उपासमारीची वेळ आली आहे.रेल्वे प्रवास सामान्य जनतेला खुला करावा, दादर रेल्वे स्थानकाला ( Dadar railway Station ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नाव द्यावे, आदी प्रलंंबित मागण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने इगतपुरी रेल्वे स्थानक प्रवेशद्वारासमोर नुकतेच आंदोलन करण्यात आले. रेल्वे स्थानक प्रबंधकांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात व केंद्रात सत्ता बदल झाला, मात्र राज्यकर्त्यांना दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा प्रश्न सोडविण्यास वेळ नाही. महिन्याभरात नामांंतर केले नाही, तर राज्यपाल आणि शिवसेना भवनासमोर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय आदिवासी सेनेचे दि. ना. उघाडे यांनी केले. यावेळी अ‍ॅड. रोहित उगले, अनुसया आगीवले, मंगाबाई आगीवले, संगीता म्हसणे, मनिषा घुले, सोमनाथ आगीवले, बुधाजी आगीवले, मंगला पवार, सुरेश पवार, सुमन लंगडे, संकेत निकाळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या