अकलापूर शिवारात दिव्यांग तरुणीवर अत्याचार

jalgaon-digital
2 Min Read

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील अकलापूर (Akalapur) परिसरातील एका वीस वर्षीय दिव्यांग तरुणीवर एका नराधमाने अत्याचार (Disabled Girl Abuse) केल्याची घटना सोमवार दि. 10 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. तर आरोपीला घारगाव पोलिसांनी अटक (Ghargav Police Arrested) करून आज दुपारी संगमनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शासकीय, खासगी कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ वापरावर बंदी

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सदर दिव्यांग तरूणी अकलापूर परिसरात राहात आहे. परिसरातील सचिन ठका खंडागळे हा सोमवारी सायंकाळी त्याच्या मुलाला घेवून तरूणीच्या घरी आला होता. त्यावेळी त्या तरूणीचा भाऊ घरी होता. खंडागळे याने दोघाही मुलांना खेळण्यासाठी घराच्या पाठीमागे पाठवले आणि त्यानंतर खंडागळे याने आतून दरवाजा बंद केला. त्याच दरम्यान तरूणीने चावा घेण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही खंडागळे याने तरूणीचे तोंड दाबत तीला ढकलून दिले. घरातील मोरी कडे ओढत नेले त्यानंतर अत्याचार केला.

संध्याकाळी तरूणीचे आई-वडील कामावरून घरी आल्यानंतर तिने सर्व झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर हे सर्वजण खंडागळे याच्या घरी गेले मात्र त्यावेळी त्याने पिडीत तरूणीच्या आईला काठीने मारत तुम्हाला कुठे जायचे जा तुम्हाला मी मोडून तोडून टाकीन अशी धमकीही दिली. याप्रकरणी पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी सचिन ठका खंडागळे याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376 (2) (ब), 452, 324, 506 सह दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 कलम 92 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करत आहे.

20 हजार मानधनावर होणार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *