Friday, April 26, 2024
Homeनगरडॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याच्या फेसबुकवरील धमकीचा निषेध

डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याच्या फेसबुकवरील धमकीचा निषेध

अकोले |प्रतिनिधी| Akole

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस, अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय कमिटी सदस्य

- Advertisement -

आणि महाराष्ट्रातील एक लढाऊ आणि प्रामाणिक शेतकरी नेते कॉ. डॉ. अजित नवले यांना नीट राहा नाही तर गोळ्या घालीन या शब्दांत एका इसमाने काल फेसबुकवर पोस्ट टाकली आणि इतर दोघा जणांनी ती लाईक केली. या तिघांपैकी किमान दोन जण तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत असे आम्ही केलेल्या तपासाअंती कळले, असल्याचे माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी म्हटले आहे.

देशभर सध्या भाजपच्या केंद्र सरकारविरुद्ध सुरू असलेल्या अभूतपूर्व देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या आणि हे आंदोलन दडपून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या कुटील कारस्थानाच्या पार्श्वभूमीवर धमकीची ही पोस्ट टाकण्यात आली आहे हे सूचक आहे.

काल 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांचा हौतात्म्य दिन आहे. त्यांचा खून करणार्‍या शक्तीच आज अशा धमक्या देत सुटल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कॉ. डॉ. अजित नवले यांना देण्यात आलेल्या या धमकीचा जळजळीत निषेध करत आहे आणि महाराष्ट्रातील सर्व देशप्रेमी आणि लोकशाही जनतेला या घटनेचा तीव्र निषेध करण्याचे आवाहन केले आहे. फेसबुकवरून अशा धमक्या देणार्‍या व त्या लाईक करणार्‍या व्यक्तींविरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ताबडतोब कायदेशीर कारवाई सुरू करणार आहे.असेही कॉ. आडम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हंटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या