Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअजिंठा-वेरुळ लेणी पर्यटकांसाठी होणार खुले

अजिंठा-वेरुळ लेणी पर्यटकांसाठी होणार खुले

मुंबई | Mumbai

करोना व्हायरस आणि लॉकडाऊन देशभरातील सर्व पर्यटन स्थळे गेले काही महिने बंदच होती. मात्र हळूहळू अनलॉकच्या टप्प्यात ही पर्यटनस्थळे कोरोना व्हायरसची योग्य ती खबरदारी घेत सुरु होत आहे.

- Advertisement -

त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळं अजिंठा-वेरुळ लेणी देखील पर्यटकांसाठी उद्यापासून सुरु होणार आहे. करोना व्हायरसशी संबंधित सर्व नियमांचे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन 10 डिसेंबरपासून हे पर्यटन स्थळ लोकांसाठी सुरु होतील. तसेच लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, या पर्यटनस्थळांवर लोकांसाठी गाइड म्हणू काम करणा-यांच्या देखील आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.

त्याचबरोबर या पर्यटनस्थळाचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पर्यटनस्थळ बंद असल्याकारणाने या पर्यटनावर व्यवसाय करणा-या येथील स्थानिक लोकांवर आर्थिक समस्या ओढावली होती. त्यामुळे जिल्हाधिकरी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या