Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedB‘Day’ ऐश्वर्या राय बच्चनने ‘मिस वर्ल्डचे’ विजेतेपद जिंकून मिळवले सर्वांच्या हृदयात स्थान

B‘Day’ ऐश्वर्या राय बच्चनने ‘मिस वर्ल्डचे’ विजेतेपद जिंकून मिळवले सर्वांच्या हृदयात स्थान

बॉलिवूड : Bollywood

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा आज 47 वा वाढदिवस. त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी मैंगलोर येथे झाला होता. चित्रपटाच्या जगात आपली ओळख निर्माण करण्यापूर्वी तिने 1994 मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकून सर्वांच्या हृदयात स्थान मिळवले.

- Advertisement -

तमिळ इंडस्ट्रीमध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ऐश्वर्याला 1999 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये ओळखले होते. या चित्रपटा नंतर ऐश्वर्याचे असे अनेक चित्रपट आले ज्यामुळे तिच्या अभिनयावर विश्वास बसला. दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ऐश्वर्या राय यांना २००९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या काही खास चित्रपटांबद्दलची हि माहिती…

हम दिल दे चुके सनम

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाने ऐश्वर्या रायला बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख दिली. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत सलमान खान आणि अजय देवगन महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले.

ताल

ऐश्वर्या रायचे 1999 मध्ये दोन विशेष चित्रपट होते. ‘हम दिल दे चुके सनम’ नंतर ‘ताल’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. ऐश्वर्यासोबत अनिल कपूर या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसला. तालचे संगीत ए.आर. रहमान यांनी दिले. ज्याने हा चित्रपट अधिक नेत्रदीपक झाला.

देवदास

ऐश्वर्या राय, शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितचा ‘देवदास’ चित्रपट आजही लोकांच्या हृदयात स्थान आहे. ‘देवदास’ हे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले होते. ऐश्वर्याला ‘देवदास’ चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

धूम-2

‘धूम’ मध्ये ऐश्वर्या रायचा अगदी अवतार दिसला होता. ऐश्वर्याचा ग्लॅमरस लूक लोकांना आवडला. ऐश्वर्यासोबत या चित्रपटात हृतिक रोशन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता.

जोधा अकबर

‘जोधा-अकबर’ या प्रेमकथेवर आधारित या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले. ऐश्वर्याचा राजपूत राजकुमारी लूक सर्वांनाच आवडला.

गुजारिश

ऐश्वर्या आणि हृतिक रोशन अनेक चित्रपटात एकत्र दिसले आहेत. ‘गुजारिश’ देखील त्यापैकी एक आहे. या चित्रपटातील ऐश्वर्याची भूमिका बाकीच्या चित्रपटांपेक्षा अगदी वेगळी होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या