Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशAir India च्या सर्व्हरवर सायबर अटॅक; ४५ लाख प्रवाशांची माहिती लीक

Air India च्या सर्व्हरवर सायबर अटॅक; ४५ लाख प्रवाशांची माहिती लीक

दिल्ली | Delhi

सार्वजनिक क्षेत्रातील विमानसेवा कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या (Air India) प्रवाशांचा डेटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला झाला आहे.

- Advertisement -

एअर इंडियाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. एअर इंडियाने शुक्रवारी एक निवदेन जारी करुन यासंदर्भातील माहिती दिली. प्रवाशांची वैयक्तिक माहिती स्टोअरिंग आणि प्रोसेसिंग SITA PSS सर्व्हरवर हा सायबर हल्ला झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. २६ ऑगस्ट २०११ ते २० फेब्रुवारी २०२१ पर्यंतचा डेटा चोरीला गेल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या सायबर हल्ल्यामध्ये प्रवाशांची नावे, जन्मतारीख, मोबाईल नंबर, पासपोर्ट डिटेल्स यासह क्रेडिट कार्डसंदर्भातील माहितीही गहाळ झाली आहे. क्रेडिट कार्डची माहिती लीक झाली असली तरी सीवीवी/सीवीसी नंबर डेटा प्रोसेसचा भाग नव्हता. त्यामुळे प्रवाशांनी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. खबरदारीसाठी ग्राहकांनी आपापल्या क्रेडिट कार्डचा पासवर्ड बदलावा, असे आवाहनही कंपनीकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या