Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याश्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात वातानुकुलीत दर्शन बारी

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात वातानुकुलीत दर्शन बारी

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ( Trimbakeshwar ) येथील मंदिर पूर्व दरवाजा येथे सात कोटी पेक्षा जास्त रुपये खर्चून वातानुकूलित (Air-conditioned) दर्शन बारी उभारण्यात आली आहे.

- Advertisement -

येत्या काही दिवसातच लवकरच दर्शन बारी भाविकांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे श्री त्रंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चे. चेअरमन न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी सांगितले. संपूर्ण भारतातील पहिलीच वातानुकूलित दर्शन बारी असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

यावेळी देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी रश्मी जाधव , सहकारी अमित माचवे, कामाचे कन्सल्टंट मिलिंद तरे हे उपस्थित होते.

दर्शन बारी ची वैशिष्ट्ये

अंदाजे १५ ते १६ हजार भाविक एकाच वेळेस दर्शन रांगेत उभे राहू शकतील.

छोटी मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांच्या सुविधेसाठी रांगेतच बसण्याची व्यवस्था.

प्रत्येक रांगेत स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, प्रथमोपचार कक्ष, थंडगार व शुद्ध पाणी, टीव्हीवर लाईव्ह दर्शनाची सुविधा.

गर्दी नसल्यास सर्व रांगेत न फिरता सरळ रांगेतून मंदिरात प्रवेशाची अत्याधुनिक व्यवस्था.

कुठल्याही कक्षातून बाहेर पडायची व्यवस्था , तसेच व इमर्जन्सी emergency गेट ची व्यवस्था.

दर्शन बारीत रांगेत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा निगराणी.

रांगेतील वातावरण प्रसन्न राहावे यासाठी पार्श्वभूमीवर सुमधुर शिव मंत्रधून संगीत.

दर्शन बारीबाहेर मूळ मंदिराच्या प्राचीन अवशेषांची उत्तम मांडणी व प्रदर्शन.

उत्तर दरवाजा येथे असलेला त्रंबकेश्वर आता भव्य लाकडी रथ पूर्व दरवाजा येथे दर्शनी राहील असे नियोजन करणार.

पूर्व दरवाजा ते नंदिकेश्वर मंदिर तसेच नंदिकेश्वर मंदिर ते त्रंबकेश्वर मंदिर या ठिकाणी भाविकांना पायर्‍यांची चढ-उतार करावे लागते त्यादृष्टीने रॅम्पचे नियोजन.

पूर्व दरवाजाच्या लगतच जागेत व्यवसायिक गाळे बांधणार

पुरातत्व विभागाच्या विविध अशा परवानग्या मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या