Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'एआयएपीजीईट' प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर

‘एआयएपीजीईट’ प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आयुष मंत्रालयाच्या (Ministry of AYUSH ) पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी ‘ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्र्स एग्झामिनेशन’ (एआयएपीजीईट) 18 सप्टेंबरला होणार आहे. यासाठी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ ( NTA )मार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना 21 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली आहे.

- Advertisement -

‘एनटीए’ मार्फत या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची सुविधा 1 ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना https://aiapget.nta. ac.in या वेबसाइटवर 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे.

याचसोबत 12 ऑगस्टला रात्री 11.50 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने फी भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जामध्ये काही सुधारणा करायची असल्यास 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान मुदत देण्यात आली आहे. हॉल तिकिट डाऊनलोड करून घेण्यासाठीची प्रक्रिया आणि दिवस जाहीर केली जाणार असल्याचे ‘एनटीए’ मार्फत सांगण्यात आले.

आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या ‘ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ आयुर्वेदा’ मार्फत आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी शाखांशी संबंधित एमडी, एमएस व पीजी डिप्लोमा हे पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात. या अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

अशी असेल परीक्षा

120 मार्काच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तास दिले जाणार असून, ही कॅाम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. सकाळी 10 ते 12 यावेळेत आयुर्वेदासाठी, तर दुपारी 3 ते 5 यावेळेत होमिओपॅथी, सिद्ध व युनानी या शाखांसाठी परीक्षा 5 घेतली जाणार आहे. आयुर्वेदासाठी हिंदी व इंग्लिश, सिद्धसाठी इंग्लिश व तमीळ, तर युनानीसाठी इंग्लिश व उर्दू माध्यमातून परीक्षा देता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या