Friday, April 26, 2024
Homeनगरचाचा, जोर लगा के..!

चाचा, जोर लगा के..!

अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी, शिवसेनेकडून तयारी सुरू असतानाच काँग्रेसनेही महापौर पदाच्या रणसंग्रामात उडी घेतली आहे. माजी शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी पत्नी शीला यांच्यासाठी फिल्डींग लावली आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘त्या आदेशानंतर चव्हाण यांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत महापौर पदाचे खल केल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

जूनमध्ये महापौर पदाची निवडणूक होणार आहे. अनुसूचित जाती महिलेसाठी हे पद राखीव आहे. काँग्रेसकडे दीप चव्हाण हे एकमेव उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडे रुपाली पारगे तर शिवसेनेकडे तीन उमेदवार आहेत. राष्ट्रवादीने गत आठवड्यातच नगरसेवकांची बैठक घेत महापौर पदा सदंर्भात चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेने थेट मुंबई गाठून श्रेष्ठींना महापौर पद मिळावे याची गळ घातली. या घडामोडीनंतर काँग्रेसचे दीप चव्हाण यांनीही फिल्डींग सुरू केली आहे.

- Advertisement -

गत आठवड्यात राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगरमध्ये ‘पदाधिकारी एकोप्याने राहिले तर काँग्रेसचा महापौर होणे अशक्य नाही’ असे वक्तव्य केले होते. त्याच वक्तव्याचा आधार घेत दीप चव्हाण यांनी पत्नी शीला यांच्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मंत्री थोरात यांच्या भेटीसाठी ते मुंबईला जाणार आहेत. पण त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत ‘काँग्रेसला संधी मिळावी’ अशी गळ घातली आहे. आ. जगताप -चव्हाण या दोघांमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात बराच खल झाला. सगळ्या शक्यता पडताळून पाहण्यात आल्या. महाविकास आघाडीचे मुंबईतील नेते निर्णय घेतील, त्यानुसार महापौर पदाचा उमेदवार ठरेल असा त्या चर्चेचा सूर होता. पत्नी शीला यांना महापौर पद मिळावे यासाठी काँग्रेसनेही रण संग्राममध्ये उडी घेतल्याने आता उत्सुकता अधिकच वाढली आहे.

  • मंत्री थोरातांशिवाय अशक्य

  • दीप चव्हाण हे अभ्यासू आणि ज्येष्ठ नगरसेवक आहेत. वार्डातील रिर्झव्हेशनमुळे स्वत:ला बाजुला करत त्यांनी पत्नी शीला यांना महापालिकेत पाठविले. महापौर पदाचे रिर्झव्हेशन पाहता चव्हाण यांना पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता गृहीत धरत दीप चाचांची धावपळ सुरू झाल्याचे दिसते आहे. काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. पाच नगरसेवकांवर चाचा महापौर पदाची खुर्ची काबीज करण्या निघाले आहेत. राष्ट्रवादी, अपक्ष, बसपाच्या पाठबळाशिवाय महापौर पदाची लढाई जिंकणे शक्य नाही. ही लढाई जिंकायची असेल तर मंत्री थोरात यांना नगरच्या राजकारणात एन्ट्री करावी लागेल. चव्हाण हे मंत्री थोरात यांच्या जोरावरच महापौर पदाची खुर्ची जिंकू शकतात, मंत्री थोरातांशिवाय चव्हाण यांनी महापौर पद अशक्य, अशी चर्चा राजकीय वुर्तळात सुरू आहे.

  • राजकीय उलथापालथ

  • महापालिकेत शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष असून त्यांचे 23 नगरसेवक आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी 19, भाजप 15, काँग्रेस 5, बसपा 4, सपा 1 असे बलाबल आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपा, सपा एकत्र आल्यास शिवसेनेपेक्षा जास्त बलाबल होते. अशावेळी भाजपची भूमिका महत्त्वाची असणार आहे. शिवसेनेनेही जोर लावल्यास मोठी राजकीय उलथापालथ पहावयास मिळेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

  • आमदारांची भेट पण शब्द नाही!

  • आ. संग्राम जगताप-दीप चव्हाण यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असली तरी अंतिम निष्कर्ष निघालेला नाही. राष्ट्रवादीचे 19 नगरसेवक असून त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच काय तो निर्णय होईल. शिवाय राज्यातील नेत्यांचा निर्णयही महत्त्वाचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने अजूनतरी चाचांना ग्रीन सिग्नल दिलेला नाही. मात्र हा ग्रीन सिग्नल मिळावा यासाठी चाचांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

  • तपानंतर काँग्रेसला संधी

  • तब्बल एक तपानंतर काँग्रेसला महापौर पदाचा चान्स दृष्टीपथास येवू पाहत आहे. महापालिका स्थापनेपासून केवळ एकदाच काँग्रेसला महापौर पद मिळाले. संदीप कोतकर यांनी 1 जुलै 2006 ते 31 डिसेंबर 2008 या काळात महापौर पद भूषविले होते. त्यानंतर काँग्रेसला महापौर पदाची संधी मिळालीच नाही. आता रिर्झव्हेशनमुळे काँग्रेसला ही संधी प्राप्त होण्याचे संकेत मिळत आहे. त्यासाठी दीप चव्हाण हे प्रयत्नशील आहेत.

  • महापौर वाकळे-चव्हाणांचीही भेट

  • दीप चव्हाण यांनी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेत मदतीची याचना केली आहे. महापौर वाकळे यांनी तसा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना कळविला जाईल. ते सांगतील तो निर्णय घेऊ असे सांगत दीप चव्हाण यांना अश्वस्थ केल्याची मािंहती सूत्रांकडून समजली. दीप चव्हाण यांनी महापौर पदासाठी भाजपकडे केलेली याचना प्रदेशनेत्यांच्या पचनी पडणार कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या