Saturday, April 27, 2024
Homeनगरअडीच वर्षांच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या

अडीच वर्षांच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तलावात अडीच वर्षाच्या मुलासह एका विवाहितेचा मृतदेह आढळून

- Advertisement -

आल्याने खळबळ उडाली आहे. सोनाली बाळकृष्ण बाबर (वय- २८) व त्यांचा मुलगा रोहित (वय- अडीच वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पोलिसांनी दिले आहेत. पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सायंकाळी उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तलावात विवाहिता व मुलाचे मृतदेह तरंगताना आढळून आले. त्यानंतर गावातील नागरिकांनी ही माहिती विवाहितेचे नातेवाईक व एमआयडीसी पोलिसांना दिली. जिल्हा रूग्णालयात त्यांना घेऊन आल्यावर ते आधीच मृत झाल्याचे समजले.

दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिचा घातपात झाल्याचा संशय केला असला तरी पोलिसांकडे मात्र याबाबत कुणीही तशी तक्रार दिलेली नाही. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर घातपात की आत्महत्या हे समोर येणार आहे.

घटना घडल्यानंतर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील तसेच सहायक निरीक्षक मोहन बोरसे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या