Friday, April 26, 2024
HomeनगरVideo : मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य; राणेंच्या प्रतिमेला जोडे मारून दहन

Video : मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य; राणेंच्या प्रतिमेला जोडे मारून दहन

अहमदनगर|Ahmedagar

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या (Jan Ashirvad Yatra) निमित्ताने महाराष्ट्राच्या (Maharashtra) दौऱ्यावर असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने आज अहमदनगर शहर शिवसेनेच्या (Ahmednagar Shivsena) वतीने गांधी मैदान (Gandhi Maidan) येथील भाजपा कार्यालयासमोर (BJP Office) निदर्शने करण्यात आली.

- Advertisement -

गुन्हा दाखल झाल्यानंतर नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, ‘मी काय….

राणेंच्या प्रतिमेला जोडे मारून दहन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) मोठ्या बंदोबस्त ठेवला होता. शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश कवडे, विक्रम राठोड, अनिल शिंदे, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, स्मिता अष्टेकर, संजय शेंडगे, रोहन ढवण आदी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान नारायण राणे विरोधात गुन्हा दाखल करावे अशी मागणी नगर शिवसेनेने केली आहे. तसा अर्ज बोराटे यांनी कोतवाली पोलीसांना दिला आहे. पोलिसांत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या