Thursday, April 25, 2024
Homeनगरमनपा कर्मचार्‍यांना मराठा सेवा संघाने दिला मदतीचा हात

मनपा कर्मचार्‍यांना मराठा सेवा संघाने दिला मदतीचा हात

अहमदनगर (प्रतिनिधी)-

करोनाबाधित झालेल्या महापालिका कर्मचार्‍यांना मराठा सेवा संघाने मदतीचा हात देवू केला आहे. कोरोनाबाधित कर्मचार्‍यांची एचआरसीटी टेस्ट सवलतीच्या दरात करून दिली जाणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी दिली आहे.

रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मनपा कर्मचार्‍यांना वैद्यकीय सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही मदत करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

सुरेश इथापे, जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ तथा अभियंता महापालिका

जिल्हाध्यक्ष असलेले इथापे हे महापालिकेत शहर अभियंता म्हणून सेवेत आहेत. महापालिकेच्या अनेक कर्मचार्‍यांना करोनाने गाठले आहे. कर्मचार्‍यांना रेमडेसिवीर इंजेक्शनही वेळेवर मिळत नाही. त्यातच एचआरसीटी तपासणीसाठी नगर शहरात अनेक लॅबमध्ये वेटींग आहे. अनेक कर्मचार्‍यांना ही टेस्ट करणेही आर्थिकदृष्टया परवडणारे नाही. ही बाब पाहून मराठा सेवा संघाने मदतीचा हात पुढे केला आहे.

करोनाबाधित कर्मचार्‍यांना एचआरसीटी टेस्ट करावयाची असल्यास शहरातील सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या डॉक्टरांशी संपर्क करून प्राधान्याने एचआरसीटी तपासणी केली जाईल. ही तपासणी करताना शुल्कात सवलतीही दिली जाणार आहे. कोरोनाग्रस्त कर्मचार्‍यांना सुरेश इथापे किंवा श्रीकांत निंबाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या