Monday, April 29, 2024
Homeनगरमहापालिकेची मंगळवारी अर्थसंकल्पीय सभा

महापालिकेची मंगळवारी अर्थसंकल्पीय सभा

अहमदनगर (प्रतिनिधी) –

मनपाची मंगळवारी (दि. 30) अर्थसंकल्पीय सभा होणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी

- Advertisement -

दिली. मनपा प्रशासनाने सादर केलेल्या व स्थायी समितीने शिफारशी केलेल्या अर्थसंकल्पावर या सभेत चर्चा केली जाणार आहे.

मनपाच्या सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा प्रशासनाने 684 कोटी 89 लाखाच्या सादर केलेल्या अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर केला होता. स्थायी समितीने यावर चर्चा करून काही शिफारशी केल्या आहेत. नेहरू मार्केट व्यापारी संकुलासाठी कर्ज घेण्याची सूचना स्थायी समितीने केली आहे. तसेच मालमत्तांचे पुर्नमुल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत. केडगाव उपनगरातील तीन एकर जागेवर क्रीडांगण तयार करण्यासाठी 50 लाख रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. पिंपळगाव माळवी येथे चित्रपटनगरीचा प्रस्ताव सादर करावा. अग्निशमन विभागासाठी दोन नवीन वाहने तात्काळ खरेदी करावीत. आरोग्य विभागाला दोन रूग्णवाहिकांची खरेदी कोरोना उपाययोजनांमधून करावी, असे स्थायी समितीने सूचीत केले.

महापौर शहर विकासनिधी 2 कोटी, उपमहापौर शहर विकासनिधी 50 लाख, स्थायी समिती सभापती 50 लाख, महिला व बालकल्याण समिती सभापती 15 लाख, उपसभापती 10 लाख, सभागृहनेता शहर विकास निधी 25 लाख, विरोधी पक्षनेता विकास निधी 25 लाख, अशी तरतूद करण्याची शिफारस स्थायी समितीने केली आहे. आता यावर महासभेत चर्चा करून अर्थसंकल्प मंजूर केला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या