Saturday, May 11, 2024
Homeनगरबाप्पांना निरोपासाठी नगरकर सज्ज

बाप्पांना निरोपासाठी नगरकर सज्ज

अहमदनगर | प्रतिनिधी

आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी नगरकर सज्ज झाले आहेत. रविवारी होणाऱ्या विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली असून पोलिसांकडून बंदोबस्ताचा आढावा घेण्यात आला.

- Advertisement -

यंदाही गणेशोत्सवावर करोनाचे सावट होते. मात्र गणेशभक्तांनी मनोभावे उत्सव साजरा केला. घरगुती गणपतीवर यंदा अधिक भर होता. काही मंडळांनी करोना नियमांचे पालन करत उत्सव साजरा केला. रविवारी गणेश विसर्जन आहे. गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी तयारी सुरू होती. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे.

गणेशभक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरीच जलकुंडात करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. करोना संकट असल्याने विसर्जनाला गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आहेत. महापालिकेने विसर्जनासाठी उपनगरांत कृत्रिम विसर्जन कुंड उभारले आहेत.

बोल्हेगावात गांधीनगर रोडवर भारत बेकरी चौकातील मनपाची खुली जागा, सावेडीत वडगाव गुप्ता रोडवरील मयूर कॉर्नर चौकातील खाजगी जागेत, भिस्तबाग परिसरात तपोवन रोडवरील नाना चौकातील खाजगी जागेत, निर्मलनगरमधील साईबाबा मंदिराच्या खुल्या जागेत, पाईपलाईन रोडवरील यशोदानगर येथील विहीर, बालिकाश्रम रोडवरील, महालक्ष्मी उद्यानाजवळील खाजगी जागेत, सावेडीतील गंगा उद्यान, नेप्ती नाका परिसरातील कल्याण रोडवरील बाळाजी बुवा विहीर, व सिना नदी पात्र, सारसनगरमधील भिंगार नाल्यालगत सारसपुलाशेजारी खाजगी जागेत, बुरुडगांव रोडवरील साईनगर उद्यान, स्टेशनरोडवरील शिवनेरी चौकातील खाजगी जागेत, केडगावमधील लिंक रोड क्रांती चौकाजवळील खाजगी जागेत, मोतीनगरमधील बुध्दविहार शेजारील खुल्या जागेत, केडगाव देवी मंदिरासमोरील जागेत, मधुर मिलन मंगल कार्यालयाशेजारील खाजगी जागेत, मुकुंदनगरमधील गोविंदपुरा मारुती मंदिराजवळ कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे.

नेप्ती नाका येथे गणेश विसर्जन जलकुंभांची महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी पाहणी केली. यावेळी महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक श्याम नळकांडे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेता संजय शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, संतोष गेंनप्पा, परुनाथ ढोकळे आदी उपस्थित होते.

आज नेप्ती नाका येथे गणेश विसर्जन जलकुंभांची (बाराव) पाहणी करून मनपा प्रशासनास जलकुंभ स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महापौर रोहिणीताई शेंडगे

- Advertisment -

ताज्या बातम्या