Thursday, April 25, 2024
Homeनगरएलसीबी निरीक्षकपदी दिनेश आहेर

एलसीबी निरीक्षकपदी दिनेश आहेर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलात महत्वाची शाखा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) निरीक्षकपदी दिनेश आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने एलसीबीला एक ‘खमक्या’ अधिकारी मिळाला आहे. त्यांनी यापूर्वी बीड एलसीबीची यशस्वी धुरा संभाळली आहे. त्यांच्या कामगिरीवर ‘फिदा’ होत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांची नियुक्ती एलसीबीच्या निरीक्षकपदी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान बदली होवूनही सोडले न गेलेले निरीक्षक अनिल कटके यांना आता सोडण्यात आले असून त्यांना आता नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यांना अजूनही ठेवले जाणार अशी चर्चा चांगलीच झडली होती, मात्र योग्य वेळ येताच अधीक्षक ओला यांनी निरीक्षक कटके यांच्या जागी निरीक्षक आहेर यांना संधी दिली आहे. त्यांच्या रूपाने एलसीबीला ‘दबंग’ अधिकारी मिळाला आहे.

आहेर बीड एलसीबीच्या निरीक्षकपदी असताना त्यांनी नगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दीपक कोलते यांच्या खून प्रकरणातील आरोपी पिन्या कापसे याला पाठलाग करून पकडले होते. पिन्या कापसेने त्यावेळी निरीक्षक आहेर यांच्या पथकावर गोळीबार केला होता. याशिवाय अनेक उल्लेखनीय कामगिरी त्यांची असून त्यांच्या कामगिरीची दखल अधीक्षक ओला यांनी घेतली आहे.

निरीक्षक आहेर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाचे ‘सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक’ राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. बीड येथील तपासात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे. निरीक्षक आहेर जिल्ह्यात बदलून आल्यानंतर त्यांनी सुरूवातीला बेलवंडी व नंतर सायबर पोलीस ठाण्याचा कारभारही यशस्वी संभाळला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या