Friday, April 26, 2024
Homeनगरआत्महत्याची पोस्ट टाकणारे गुरूजी अखेर सापडले सुखरूप

आत्महत्याची पोस्ट टाकणारे गुरूजी अखेर सापडले सुखरूप

अहमदनगर (प्रतिनिधी)

2018-19 च्या बदली (Teacher Transfer 2018-19) प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अन्याय केला. या विरोधात दाद मागूनही दाद मिळेना…

- Advertisement -

यामुळे अखेर वैफल्यग्रस्त झालेल्या एका तालुक्यातील गुरूजींनी गुरूवारी सायंकाळी टोकाचे पाऊल उचलले. फेसबुकवर (Facebook) बदलीत झालेल्या अन्यायाला कंटाळून मी आता आत्महत्याच्या निर्णयापर्यंत आलो आहे, अशी भावनिक पोस्ट टाकून गुरूजी नॉटरिचेबल झाले, अन् एकच धावधाव सुरू झाली. अखेर घराच्या मंडळींनी पोलीस स्टेशन (Police Station) गाठत मिसिंग दाखल केली आणि पोलीसांनी मोबाईल लोकेशनच्या (Mobile Location) आधारे गुरूजींना शेजारच्या तालुक्यातून ताब्यात घेतले.

दूध उत्पादकांना दिलासा; दूध दरात तातडीने वाढ व दुधाला FRP चा कायदा करणार

त्याचे झाले असं, संबंधीत गुरूजी तसे शांत अन् चांगले. पण बिघडले की कोणाचे नाही. या गुरूजींची 2018-19 मध्ये बदली झाली. ही बदली चुकीची असल्याचा गुरूजींचा आक्षेप आहे. या बदली विरोधात गुरूजींनी प्रशासनाकडे दादही मागितली. पण उपयोग झाला नाही. यामुळे गुरूजींचा जिल्हा परिषद शिक्षण विभागासह, जिल्ह्यातील शिक्षक संघटनांविरोधात रोष असल्याचे त्यांच्या फेसबुक पोस्टवरून (Facebook post) लक्षात येते. गुरूजींनी गुरूवारी सायंकाळी टोकाचे पाऊल उचलत न्याय मिळत नसल्याने आत्महत्याच्या निर्णयापर्यंत आल्याची फेसबुकवर पोस्ट टाकली आणि एकच खळबळ उडाली.

ही बाब घरांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी गुरूजींची मिसिंगची तक्रार नोंदविण्यात आली. गुरूजींचा मोबाईल सुरू होताच त्यांचे लोकेशन शेजारच्या तालुक्यात सापडले. पोलीसांनी तात्काळ गुरूजींचा ठावठिकाणा शोधून त्यांना ताब्यात घेतले. पण घडल्या प्रकारवर गुरूजींनी भाष्य करणे टाळले. पोलीसांनी दोन तास गुरूजींचे समुपदेशन केले. पण गुरूजी काही बोलण्या तयार नाहीत. अखेर एका ओळीचा जबाब घेवून गुरूजींना घरांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, गुरूजींच्या फेसबुक पोस्ट जिल्हाभर सोशल मीडियावर व्हायरल झाली.

चुकीच्या बदल्याची चौकशी होणार का?

दरम्यान, संबंधीत गुरूजींनी बदलीमध्ये अन्याय झाल्याचे सांगत टोकाचे पाऊल उचलले. या प्रकारामुळे 2018-19 च्या बदल्यामध्ये काही चुकीच्या बदल्या झाल्याची चर्चा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये होत असून त्यांची चौकशी कोण आणि कशी करणार अशी चर्चा सध्या शिक्षकांमध्ये झडतांना दिसत आहे.
……………..

- Advertisment -

ताज्या बातम्या