Friday, April 26, 2024
Homeनगरमिक्सोपॅथिच्या विरोधात नगरच्या डॉक्टरांचे उपोषण

मिक्सोपॅथिच्या विरोधात नगरच्या डॉक्टरांचे उपोषण

अहमदनगर l प्रतिनिधी l Ahmednagar

मिक्सोपॅथिच्या विरोधात नगरमधील डॉक्टरांनी आजपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. नेप्ती रोडवरील इंडियन मेडिकल असोशिएशनच्यावतीने आजपासून हे उपोषण सुरू केले.

- Advertisement -

केंद्र सरकारने आरोग्य सेवेचे खिचडीकरण थांबवावे, आणि जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे, यासाठी आयएमएने मिक्सोपॅथिच्या विरोधात उपोषण सुरू केल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांनी दिली.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सेक्रेटरी डॉ.मंगेश पाटे, नगर शाखाध्यक्ष डॉ.अनिल आठरे, सेक्रेटरी डॉ.सचिन वहाडणे, सीडब्ल्यूसी मेंबर डॉ.निसार शेख, व्हाईस प्रेसिडेंट डॉ.नरेंद्र वानखेडे, डॉ.सागर झावरे, डॉ.सतीष सोनवणे, खजिनदार डॉ.गणेश बडे, जॉईन्ट सेक्रेटरी डॉ.अशोक नरवडे, डॉ.रामदास बांगर, डॉ.अमित कराडे, डॉ.राहुल पंडित, डॉ.पंकज मते, डॉ.कल्याणी चौधरी, डॉ.आसाराम भालसिंग, डॉ.मुग्धा तन्वर, डॉ.प्रज्ञा जोशी, डॉ.गणेश झरकर, डॉ.सचिन लवांडे, डॉ.गजानन काशिद, डॉ.सुशिल नेमाणे, डॉ.अशोक शिंदे, डॉ.सचिन उद्मले, डॉ.सचिन पांडूळे, डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ.सुनिता अकोलकर, डॉ.सोनाली वहाडणे, डॉ.प्रकाश व डॉ.सुधाताई कांकरिया, डॉ.स्मिता पाठक यांच्यासह डॉक्टर्स उपोषणात सहभागी झाले आहेत.

डॉ.मंगेश पाटे म्हणाले, जगभरात अनेक ठिकाणी भारतीय डॉक्टर्स त्यांच्या निष्णांत सेवेमुळे नावाजले गेले आहेत. कुठल्याही देशातील जनतेचे आरोग्य हे तेथील चांगल्या आरोग्य सेवेवर अवलंबून असते. आज आपल्या देशामध्ये असलेल्या उपचार पद्धती उदा.आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, आधुनिक वैद्यक शास्त्र, अ‍ॅलोपॅथि, असे असून, तरी देखील देशातील 96 टक्के जनतेचा आधुनिक वैद्यक शास्त्रातील उपचार घेण्याकडे कल आहे. याचे कारण म्हणजे सततचे संशोधन व अद्यावत तंत्रज्ञान यामुळे हे शक्य झाले आहे. इतरही लोकांनी (आयुर्वेद, होमिओपॅथी) अशाप्रकारचे संशोधन करावे. ज्ञानाचे अद्यायावतीकरण करुन त्यांची ज्ञानशाखा जागृत ठेवावी, अशी आमची अपेक्षा असून, नूतन शैक्षणिक धोरण आणि सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन्स् या संस्थेने 20नोव्हेंबर 2020 च्या परिपत्रकानुसार या सर्व उपचार पद्धती एकत्रित करुन आरोग्य सेवेची खिचडी करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे. त्यास इंडियन मेडिकल असोसिएशनचा ठाम विरोध असल्याचे सांगितले.

मुलभूत सैद्धांतिक मांडणीमध्ये फरक असलेल्या उपचार पद्धती एकत्रिकरणाला विरोध आहे.त्यामुळे आरोग्य सेवेतील गुणवत्ता व सुरक्षिततेबाबत मोठे आव्हान उभे राहिले आहे. सरकारने सदर प्रस्ताव मागे घेऊन जनतेच्या आरोग्यला धोकादायक परिस्थिती उपचार पद्धतीने अस्तित्वात येऊ नये.

डॉ. अनिल आठरे, अध्यक्ष, आयएमए

रविवारी मुंबईत पुढची दिशा

आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी 14 फेब्रुवारीला आंदोलनाची सांगता होणार आहे. या दिवशी राजधानी चलो, असा नारा देऊन आयएमएचे प्रतिनिधी मुंंबईत एकत्र येऊन आंदोलन करणार आहे. तेथे इंडियन मेडिकल असोशिएशनच्या केंद्रीय पदाधिकार्‍यांच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईलअसे डॉ. आठरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या