Friday, April 26, 2024
Homeनगरराज्यातील 192 कारखान्यांकडून 556 लाख टन उसाचे गाळप

राज्यातील 192 कारखान्यांकडून 556 लाख टन उसाचे गाळप

नेवासा | सुखदेव फुलारी| Newasa

यंदाच्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील एकूण 192 साखर कारखान्यांनी 10 जानेवारी 2022 अखेर 556.01 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 546.49 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा 9.83 टक्के आहे. नगर जिल्ह्यातील 18 कारखान्यांनी 68 लाख 96 हजार 528 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात 22 कारखान्यांकडून 69 लाख टन उसाचे गाळप

नगर जिल्ह्यातील 14 सहकारी व 8 खाजगी अशा एकूण 22 साखर कारखान्यांनी 10 जानेवारी 2022 अखेर 68 लाख 96 हजार 528 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 64 लाख 42 हजार 085 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 09.34 टक्के आहे. नगर जिल्ह्यातील एकूण 68 लाख 96 हजार 528 मेट्रिक टन ऊसापैकी 14 सहकारी साखर कारखान्यांनी 46 लाख 54 हजार 870 मेट्रिक टन तर 8 खाअगी साखर कारखान्यांनी 22 लाख 41 हजार 658 मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केलेले आहे.

यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेला आहे. नगर जिल्ह्यातील 23 पैकी 22 साखर कारखान्याचे हंगाम सुरू आहेत. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 5 लाख 93 हजार 975 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यामध्ये तर अंबालिका या खासगी साखर कारखान्याने 8 लाख 41 हजार 345 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून जिल्ह्यात आघाडी घेतलेली आहे.

राज्यात खासगी कारखान्यांची संख्या वाढली….

राज्यात 192 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू असून त्यामध्ये 95 सहकारी व 97 खाजगी साखर कारखान्याचा समावेश आहे. खासगी साखर कारखान्यांना पर्याय म्हणून महाराष्ट्र राज्यात सहकारी साखर कारखानदारीचा उदय झाला. आता मात्र उलटे चित्र पहावयास मिळत आहे. दिवसेंदिवस दिवस खासगी कारखान्यांची संख्या वाढत आहे. सहकारी (95) पेक्षा निम्म्याहून अधिक संख्या खाजगी (97) साखर कारखान्यांची आहे. भविष्यात ती आणखी वाढली तर नवल वाटणार नाही.

नगर जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांनी 10 जानेवारी अखेर केलेले ऊस गाळप, साखर उत्पादन व उतारा

अ.नं. कारखाना ऊस गाळप साखर उत्पादन उतारा

मे. टन क्विंटल टक्के

1) ज्ञानेश्वर 5,93,975 5,33,700 8.99

2) मुळा 5,10,460 4,20,000 8.23

3) संजीवनी 3,35,814 2,88,300 8.59

4) कोपरगाव 2,95,874 2,85,200 9.64

5) गणेश 1,47,050 1,06,800 7.26

6) अशोक 2,92,750 3,09,550 10.57

7) प्रवरा 3,30,900 2,56,975 7.77

8) राहुरी 1,72,590 1,72,100 9.97

9) श्रीगोंदा 4,19,930 4,27,025 10.17

10) संगमनेर 5,56,420 5,56,010 9.99

11) वृद्धेश्वर 2,01,800 1,83,250 9.08

12) अगस्ती 2,37,337 2,49,340 10.51

13) केदारेश्वर 1,92,920 1,60,850 8.34

14) कुकडी 3,67,050 3,53,100 9.62

15) अंबालिका 8,41,345 8,32,450 9.89

16) गंगामाई 4,85,400 4,28,200 8.82

17) साईकृपा 1,32,623 1,32,000 9.95

18) प्रसाद शुगर 2,91,500 2,86,600 9.83

19) जय श्रीराम 1,45,705 1,29,210 8.87

20) युटेक 1,93,710 1,91,500 9.89

21) क्रांती शुगर 65,180 63,275 9.71

22) पियुष 86,195 76,650 8.89

एकूण 68,96,528 64,42,085 9.34

राज्यातील विभागनिहाय कारखान्यांचे 10 जानेवारी 2022 पर्यंतचे ऊस गाळप, साखर उत्पादन व साखर उतारा

विभाग ऊस गाळप साखर उत्पादन उतारा

लाख टन लाख क्विंटल टक्के

कोल्हापूर 132.81 148.27 11.16

पुणे 113.89 114.13 10.02

अहमदनगर 74.95 69.88 9.32

सोलापूर 132.83 118.09 8.89

औरंगाबाद 43.46 40.05 9.22

नांदेड 51.97 50.87 9.79

अमरावती 03.99 03.43 8.60

नागपूर 02.11 01.77 8.39

एकूण 556.01 546.49 9.83

- Advertisment -

ताज्या बातम्या