Saturday, April 27, 2024
Homeनगरजिल्ह्यात पुन्हा 3117 बाधित वाढले

जिल्ह्यात पुन्हा 3117 बाधित वाढले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक सेवांचा कालावधी कमी करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही करोना संसर्ग कमी होण्याचे नाव घेण्यास तयार नाही. बुधवारी नव्याने 3 हजारांपेक्षा अधिक नवे करोना रुग्ण सापडले आहेत. तर उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 22 हजारांच्या टप्प्यापर्यंत पोहचली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात काल 2 हजार 384 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोना मुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 21 हजार 625 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 83.72 टक्के आहे. दरम्यान, नव्याने 3 हजार करोना रुग्ण वाढले असून यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 21 हजार 989 झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 420, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 176 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 521 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 176, अकोले 3, जामखेड 48, कर्जत 3, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 32, नेवासा 6, पारनेर 41, पाथर्डी 18, राहुरी 2, संगमनेर 3, शेवगाव 3, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 32, कँटोन्मेंट बोर्ड 8 आणि मिलिटरी हॉस्पिटल 26 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 604, अकोले 14, जामखेड 4, कर्जत 13, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 91, नेवासा 15, पारनेर 42, पाथर्डी 23, राहाता 91, राहुरी 40, संगमनेर 99, शेवगाव 9, श्रीगोंदा 21, श्रीरामपूर 38, कँटोन्मेंट बोर्ड 17 आणि इतर जिल्हा जिल्हा 29 आणि इतर राज्य 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 1 हजार 521 जण बाधित आढळुन आले. मनपा 118, अकोले 116, जामखेड 57, कर्जत 153, कोपरगाव 52, नगर ग्रामीण 245, नेवासा 85, पारनेर 74, पाथर्डी 79, राहाता 158, राहुरी 94, संगमनेर 26, शेवगाव 41 श्रीगोंदा 47, श्रीरामपूर 155, कॅन्टोन्मेंट बोर्ड 15 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी करोना मृतांची संख्या 1 हजार 635 होती. त्यात बुधवारी वाढ होवून 1 हजार 656 जणांचा करोनामुळे जीव गेला आहे.

नगर मनपा 898, नगर ग्रामीण 368, राहाता 249, श्रीरामपुर 225, कर्जत 169, पारनेर 157, राहुरी 136, अकोले 133, संगमनेर 128, पाथर्डी 120, जामखेड 109, नेवासा 106, श्रीगोंदा 86, कोपरगाव 76, शेवगाव 53, भिंगार 40, अन्य जिल्हा 35, लष्कर 26 आणि अन्य राज्य 3 आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या