Friday, April 26, 2024
Homeनगरकरोनामुक्तीची टक्केवारी 96.33 टक्के

करोनामुक्तीची टक्केवारी 96.33 टक्के

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आतापर्यंत 57 हजार 106 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे

- Advertisement -

आता 96.33 टक्के झाले आहे. दरम्यान शनिवारी नव्याने 185 ने करोना रुग्णाची वाढ झाली असून उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 275 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 34, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 65 आणि अँटीजेन चाचणीत 86 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 6, जामखेड 3, नगर ग्रामीण 6, नेवासा 7, पारनेर 2, पाथर्डी 2, राहुरी 1, शेवगाव 3, श्रीगोंदा 1, कॅन्टोन्मेंट 1, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 33, अकोले 6, कर्जत 2, नगर ग्रामीण 2, नेवासा 2, पारनेर 4, पाथर्डी 1, राहाता 7, राहुरी 2, संगमनेर 5, शेवगाव 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत काल 86 जण बाधित आढळून आले. यामध्ये अकोले 20, जामखेड 14, कर्जत 7, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 1, नेवासा 10, पारनेर 1, पाथर्डी 10, राहुरी 1, शेवगाव 9, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 47, अकोले 20, जामखेड 3, कर्जत 6, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 31, नेवासा 21, पारनेर 11, पाथर्डी 26, राहाता 24, राहुरी 14, संगमनेर 38, शेवगाव 13, श्रीगोंदा 6, श्रीरामपूर 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या