Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी हालचालींना वेग

जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी हालचालींना वेग

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदाच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याची हालचाल सुरू झाली आहे. दरम्यान बँकेचे चेअरमनपद रिक्त झाले असल्याची माहिती निवडणुक प्राधिकरणाकडे पाठवण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची सभा काल (शुक्रवारी) झाली.

- Advertisement -

रिक्त पदाचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक व सचिव, निवडणुक प्राधिकरण पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. आता प्राधिकरणाकडून चेअरमनपदाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

जिल्हा बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे बँकेचे चेअरमनपद रिक्त झाले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत चेअरमनपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर व्हा.चेअरमनपद काँग्रेसकडे देण्याचे ठरले होते. त्यानुसार अ‍ॅड. शेळके यांची चेअरमनपदी तर अ‍ॅड. माधवराव कानवडे यांची व्हा. चेअरमनपदी नियुक्त करण्यात आली.

दरम्यान अ‍ॅड. शेळके यांच्या निधनामुळे चेअरमनपदाची जागा रिक्त झाली आहे. आता या जागी कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले आहे. चेअरमन पदासाठी इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक मातबगार या बँकेचे संचालक आहेत. यामुळे आता चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाची वर्णी लागणार याबद्दल सध्या उत्सुकता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ नेत्यांनी इच्छुकांची माहिती घेतल्याचे समजले. बँकेत पक्षीय बलाबलापेक्षा पक्षांतर्गत गटांची समीकरणे अधिक महत्वाची ठरतात, यामुळे या निवडीकडे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या