युक्रेनमध्ये अडकलेल्या 25 जणांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी)-

रशियाने युक्रेनवर सैनिकी चढाई केल्याने युद्धाला तोंड फुटले आहे. युद्धजन्य युक्रेनमध्ये नगर जिल्ह्यातील 25 विद्यार्थी अडकल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे. या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासन सक्रीय झाले आहे. जिल्ह्यातून ज्या पालकांची मुले युक्रेनमध्ये आहेत. याचा शोध प्रशासन घेत आहे. शुक्रवारी सकाळी हा आकडा 21 होता. त्या दिवसभरात चार जणांची भर पडल्याने शुक्रवारी रात्रीपर्यंत युक्रेनमध्ये 25 विद्यार्थी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रशिया व युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. जिल्ह्यातून युक्रेनमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थी गेले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी गेले आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी रात्री उशीरा नगरमधील एड्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे डॉ. महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत युक्रेनला शिक्षणासाठी गेलेल्यांची यादी जिल्हा प्रशासनाला सादर केली.

त्यानंतर खातजमा केल्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत 21 जणांचा यात समावेश असल्याचे समोर आले. सायंकाळी हा आकडा 25 झाला होता. आता जिल्हा प्रशासन या विद्यार्थ्यांची यादी राज्य सरकारच्या अधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून भारतीय दूतावासाला ही यादी पाठविली जाणर आहे. हे काम वेगाने पूर्ण केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

येथे करा संपर्क

काल रात्री परराष्ट्र मंत्रालयाच्या उच्चपदस्त बैठकीनंतर काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनानेही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांसाठी हेल्पलाईन कार्यान्वीत केली आहे. नागरिक/विद्यार्थ्यांचे नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्षातील 0241-2323844 किंवा 2356940 या क्रमांकाशी अथवा टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बिडवे (8275897897) किंवा [email protected] येथे संपर्क करावा. थेट केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालयाशी देखिल संपर्क करता येणार आहे. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक 011-23012113/23014105/23017905 किंवा टोल फ्री क्रमाक 1800118797 अथवा [email protected] या मेलवर संपर्क करता येईल.

यादी मुंबईला पाठवणार

नगर जिल्ह्यातील 21 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे. राज्य सरकारकडून युक्रेनमध्ये अडकलेल्यांची यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याची यादी राज्य सरकारच्या अधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून भारतीय दूतावासाला ही यादी पाठविली जाणर आहे. हे काम वेगाने पूर्ण केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

असे आहेत विद्यार्थी

शेवगाव 2, पाथर्डी 3, नगर शहर 12, नेवासा 1, राहाता 1, अकोले 1, पारनेर 1, श्रीगोंदा 1, जामखेड 1 आणि कर्जत 2 यांचा समावेश आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *