श्रीरामपूर, राहुरी, नेवासा आणि राहात्यासह 10 तालुक्यांत करोना संख्या दहाच्या आत

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात रविवारी 226 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्यांची संख्या 3 लाख 45 हजार 115 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.63 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल जिल्हयाच्या रुग्ण संख्येत 140 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 384 इतकी झाली आहे. जिल्ह्यात श्रीगोंदा, संगमनेर, पारनेर आणि कर्जत तालुका वगळता उर्वरित दहा तालुक्यांत नव्याने करोना रुग्णांची संख्या ही दहाच्या आत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 78, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 28 आणि अँटीजेन चाचणीत 34 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अकोले 1, जामखेड 1, कर्जत 10, नगर ग्रामीण 4, पारनेर 12, राहाता 4, राहुरी 1, संगमनेर 11, श्रीगोंदा 27, मिलिटरी हॉस्पिटल 2 आणि इतर जिल्हा 5 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 2, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 3, नेवासा 4, पारनेर 2, पाथर्डी 2, राहाता 2, राहुरी 1, संगमनेर 1, शेवगाव 6, श्रीगोंदा 1 आणि श्रीरामपूर 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 34 जण बाधित आढळून आले. अकोले 1, जामखेड 3, कर्जत 2, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 01, नेवासा 2, राहता 2, राहुरी 5, संगमनेर 2, शेवगाव 2, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 1 आणि इतर राज्य 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 14, अकोले 16, जामखेड 6, कर्जत 21, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 14, नेवासा 10, पारनेर 17, पाथर्डी 3, राहाता 28, राहुरी 16, संगमनेर 13, शेवगाव 7, श्रीगोंदा 23, श्रीरामपूर 12 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *