जिल्ह्यात आज ‘एवढे’ करोना बाधित वाढले

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज 215 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 75 हजार 442 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.28 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 235 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1756 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 94, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 114 आणि अँटीजेन चाचणीत 27 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 11, जामखेड 06, कर्जत 13, कोपरगाव 08, पारनेर 01, पाथर्डी 09, राहाता 15, राहुरी 06, संगमनेर 18, शेवगाव 03, कॅन्टोन्मेंट 03, इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 37, अकोले 01, कर्जत 02, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 05, नेवासा 11, पारनेर 14, पाथर्डी 03, राहाता 07, राहुरी 01, संगमनेर 09, शेवगाव 02, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 01, कॅन्टोन्मेंट 02, इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 27 जण बाधित आढळुन आले. मनपा 10, कर्जत 01, नगर ग्रामीण 03, नेवासा 02, पारनेर 01, राहाता 08, आणि कॅन्टोन्मेंट 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 63, अकोले 21, जामखेड 01, कर्जत 02, कोपरगाव 12, नगर ग्रामीण 11, नेवासा 06, पारनेर 07, पाथर्डी 03, राहाता 29, राहुरी 07, संगमनेर 31, शेवगाव 01, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 09, कॅन्टोन्मेंट 02 आणि इतर जिल्हा 09 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 75442

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 1756

* मृत्यू : 1161

* एकूण रूग्ण संख्या : 78359

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *