Friday, April 26, 2024
Homeनगरसुवर्णा कोतकरांचा जामीन नामंजूर

सुवर्णा कोतकरांचा जामीन नामंजूर

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव डबल मर्डर केसमधील आरोपी माजी उपमहापौर सुवर्णा संदीप कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नगरच्या कोर्टाने फेटाळला आहे. कोतकर या गेल्या दोन वर्षापासून फरार आहेत.

केडगावात संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोघा शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सुवर्णा कोतकर या आरोपी आहेत. सीआयडीने या प्रकरणाचा तपास करत कोर्टात चार्जशीटही दाखल केले आहे. मात्र कोतकर या प्रकरणात अजूनही फरारच आहेत. दिवाळीच्या काळात त्यांनी नगरच्या कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. कोर्टाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला. त्यानंतर अंतिम अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली होती. मात्र निकाल राखीव ठेवला होता. आज कोर्टाने कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या