Saturday, April 27, 2024
Homeनगरया कारणामुळे रखडली अहमदनगर महापालिकेची भरती

या कारणामुळे रखडली अहमदनगर महापालिकेची भरती

अहमदनगर (प्रतिनिधी) – अस्थापनेवर 35 टक्के खर्च मर्यादा घालून देण्यात आल्याने महापालिकेतील रिक्त पदे भरली जात नाही याकडे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. ही अट शिथील करून पद भरतीस मान्यता द्यावी अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

महापालिकेतील रिक्त पदे भरण्याकरीता 35 टक्के अस्थापना खर्चाची मर्यादा शिथिल करावी अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

- Advertisement -

शासनाने महापालिकेचा सुधारीत आकृतीबंध फेबु्रवारी 2016 मध्ये मंजूर केला. अटी,शर्थीच्या आधीन राहून या आकृतीबंधाला मंजुरी दिली गेली. सुधारीत आकृतीबंधानुसार महापालिकेत 576 पदे रिक्त आहेत. आकृतीबंधाद्वारे ही पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे. अस्थापना खर्चाची मर्यादा ही केवळ 35 टक्के इतकी आहे. त्यमुळे पद भरती रखडली आहे. तांत्रिक, अतांत्रिक पदे भरती करताना 35 टक्के अस्थापना खर्चाची मर्यादा शिथील करावी अशी मागणी बोराटे यांनी केली आहे.

……………….

नगरकरांना मिळेल रोजगार

कोरोना आणि आर्थिक मंदी पाहता नगरकरांच्या हाताला रोजगार मिळणे गरजेचे आहे. महापालिकेतील 576 रिक्त पदे भरली तर बेरोजगार नगरकर तरुणांना रोजगार मिळणे सोपे होणार आहे. 35 टक्के खर्चाची मर्यादा शिथील करून ही पदे भरण्यास मान्यता मिळावी अशी मागणी बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या