नगर जिल्ह्यात आज 203 करोना बाधितांची वाढ

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज 158 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 65 हजार 813 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.76 टक्के इतके झाले आहे. दरम्यान काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 203 ने वाढ झाल्याने सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1176 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 46, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 67 आणि अँटीजेन चाचणीत 90 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 25, कर्जत 02, कोपरगाव 01, नगर ग्रामीण 06, पारनेर 02, पाथर्डी 02, राहुरी 02, संगमनेर 02, शेवगाव 01, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 01, इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 15, अकोले 06, कर्जत 02, कोपरगाव 05, नेवासा 01, पारनेर 03, पाथर्डी 03, राहाता 11, राहुरी 03, संगमनेर 10, श्रीरामपूर 05, इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 90 जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा 20, कर्जत 06, कोपरगाव 07, नगर ग्रामीण 03, नेवासा 01, पाथर्डी 08, राहाता 07, संगमनेर 23, शेवगाव 11, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 47, अकोले 04, कर्जत 07, कोपरगाव 04, नगर ग्रामीण 05, नेवासा 11 , पारनेर 02, पाथर्डी 12, राहाता 13, राहुरी 01, संगमनेर 22, शेवगाव 05, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 07, कॅन्टोन्मेंट 04, मिलिटरी हॉस्पिटल 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 65813

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 1176

* मृत्यू : 1025

* एकूण रूग्ण संख्या : 68014

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *