Friday, April 26, 2024
Homeनगरपथकर घोटाळ्याप्रकरणी दोषींवर होणार कारवाई

पथकर घोटाळ्याप्रकरणी दोषींवर होणार कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर छावणी परिषदेच्या (Ahmednagar Camp Council) व्हेईकल इंट्री टॅक्सचा (Vehicle entry tax) (पथकर नाका) ठेका (Contract) घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार करून सरकारची फसवणूक (Government fraud) केल्याच्या आरोपांबाबत चौकशी (Inquiry) करून दोषींवर 48 तासांत कारवाई करण्याचे आश्वासन कॅन्टोन्मेंटचे (cantonment) पुणे येथील प्रिन्सिपल डायरेक्टर संजीवकुमार (Principal Director Sanjeev Kumar) यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळास दिले.

- Advertisement -

ठेकेदाराबाबतच्या तक्रारीचे (Complaints about the contractor) निवेदन भिंगार (Bhingar) येथील सर्वपक्षीयांच्या वतीने संजीवकुमार (Sanjeev Kumar) यांना देण्यात आले. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे शहर (NCP City) जिल्हा संघटक मतीन सय्यद, भाजपाचे प्रकाश लुणिया, काँग्रेसचे श्याम वागस्कर, शिवसेनेचे प्रतीक भंडारी, अ‍ॅड. अक्षय भांड, आरपीआयचे अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते नईम शेख आदींचा समावेश होता.

निवेदनात म्हटले आहे की, छावणी परिषद पथकर नाक्याचा ठेका (Camp Council Pathkar Naka contract) मिळविताना ठेकेदाराने बँक गॅरंटी (Bank guarantee) व बँक सॉल्वेन्सी 4 करोड 50 लाख रुपयांची देण्यात आली आहे. यामध्ये बँक गॅरंटी बनावट असल्याचेही लक्षात आले. कंत्राटी बेसवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना भविष्य निधीची पेमेंट स्लीप (PF Slip) देण्यात आली. सप्टेंबर 2020 मध्ये निविदा ऑनलाईन उघडण्यात आली व नोव्हेंबर महिन्यात एन. एच. इंजीनियरिंगला ठेका दिला.

यामध्ये दोन महिन्याची तफावत का केली? ई निविदेमध्ये टेंडर (E-Tender) भेटल्यावर ते पंधरा दिवसांत घेतले नाही तर ते रीटेंडर करण्याचे आदेश आहेत. तरीही दोन महिन्याची मुदतवाढ ठेकेदाराला देण्यात आली. यामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. भिंगार (Bhingar) येथील सर्वपक्षीयांच्या वतीने नवेदन देण्यात आल्यानंतर संजीवकुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या