अहमदनगर बार असोसिएशनची निवडणूक जाहीर

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी)

अहमदनगर बार असोसिएशन या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकूण १३ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर रोजी मतदार होणार आहे. मतदानानंतर लगेच मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येणार आहे.

करोनामुळे मागील वर्षी बार असोसिएशनची निवडणूक घेण्यात आली नव्हती. आता निवडणूक घेण्यास वरिष्ठ न्यायालयाने परवानगी दिली असून, निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. अशोक गुंड पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार २० ते २२ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्जाची विक्री आणि स्वीकृती केली जाणार आहे.

२२ ऑक्टोबर रोजी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे, २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून, पात्र उमेदवारांची यादी २३ ऑक्टोबरलाच प्रसिद्ध केली जाणार आहे. तर २९ ऑक्टोबर रोजी मतदार होणार असून, त्याच दिवशी निकाल घोषित केला जाणार आहे. या संस्थेचे सुमारे ८०० सभासद आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *