अहमदाबाद संघात पांड्याचे ‘हार्दिक’ स्वागत; दिली मोठी जबाबदारी

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२२ चा (IPL 2022) हंगाम सुरु होण्यासाठी अवघ्या २ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. फिटनेसच्या समस्येला तोंड देणाऱ्या भारतीय संघाचा (Team India) आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी अष्टपैलु हार्दिक पांड्याबद्दल (Hardik Pandya) एक चांगली बातमी समोर येत आहे…

आयपीएल १५ मध्ये (IPL 15) नव्याने सहभागी होत असलेल्या अहमदाबाद संघाने (Ahmedabad Team) हार्दिक पांड्याला आपल्या संघाचा कर्णधार (Captain) म्हणून एक नवीन जवाबदारी दिली आहे.

२०१९ पासून हार्दिक पांड्या फिटनेसच्या समस्येचा सामना करत आहे. त्याने पाठीची शस्त्रक्रियादेखील (Surgery) केली आहे. तरीही संपूर्ण फिट नसल्यामुळे तो गोलंदाजी (Bowling) करू शकत नव्हता.

आयपीएल २०२१ (IPL 2021) आणि टी २० वर्ल्डकप २०२१ (T20 World Cup 2021) मध्येही त्याने गोलंदाजी केली नव्हती. याचा फटका त्याला भारतीय संघातील (IND) आपले स्थान कायम राखण्यावरही बसला होता. शिवाय मुंबई इंडियन्स (MI) संघानेही आयपीएल २०२२ साठी (IPL 2022) त्याला आपल्या संघात कायम राखले नव्हते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या गुजरातचा असल्यामुळे येथील लोकांमध्ये त्याच्याविषयी जिव्हाळा निर्माण होईल. टीमची फॅन फॉलोविंग वाढवण्यासाठी अहमदाबाद संघाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

याशिवाय हार्दिक पांड्यासोबत अहमदाबाद संघात अफगाणिस्तानचा फिरकीपटू आणि सनरायझर्स हैद्राबादचा (sunrisers hyderabad) माजी खेळाडू रशीद खानही (Rashid Khan) या संघातून खेळणार असल्याची माहिती मिळत आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *