Sunday, April 28, 2024
Homeनगरनगरचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या स्मृतीस्थळी चादर अर्पण

नगरचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या स्मृतीस्थळी चादर अर्पण

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहराच्या 531 व्या स्थापना दिनानिमित्त शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांचे स्मृतीस्थळ असलेले बागरोजा येथे चादर अर्पण करण्यात आली. यावेळी आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, मन्सूर शेख, हरजितसिंह वधवा, उबेद शेख, अन्सार सय्यद, जुनेद शेख, सुहास मुळे, दिलावर सय्यद, नवेद शेख, रमीज शेख, अदनान शेख, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, डॉ.रिजवान अहेमद, हमजा चुडीवाला, वहाब सय्यद, नईम सरदार, समीर मन्यार आदी उपस्थित होते.

यावेळी आ. जगताप म्हणाले, देशात अनेक शहरे आहेत. मात्र नगर शहराला एक स्थापना दिन असून त्याचा दरवर्षी वर्धापन दिन साजरा होतो. हे या ऐतिहासिक शहराचे वैशिष्टये आहे. इतिहासाचे जतन करुन विकसाचे पर्व गाठायचे आहे. पुरातत्व विभागाने मंजूरी दिल्यावर बागरोजाकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम मार्गी लावण्यात येणार आहे. ऐतिहासिक वास्तुसंग्राहलयाचे नुतनीकरण झाले आहे.

- Advertisement -

जगातील दुर्मिळ वस्तू व वेगळेपणा या शहरात आहे. नगरकरांनी शहराचा इतिहास जाणून शहराप्रती आपुलकी व आस्मिता जोपासावी. नगरकरांनी करोनाशी धैर्याने लढा देऊन एमकेकांना मदतीचा हात दिला. यातून शहरातील एकता स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर बाबासाहेब वाकळे यांचे मनेागत झाले. राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त अमोल बागुल यांनी बहारदार बासरी वादन करुन यावेळी शहराचे संस्थापक अहमद बादशाह यांना आदरांजली वाहिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या