Wednesday, April 24, 2024
Homeनगरवृध्दाच्या प्लॉटवर अर्बन बँकेतून घेतले तीन कोटीचे कर्ज

वृध्दाच्या प्लॉटवर अर्बन बँकेतून घेतले तीन कोटीचे कर्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)

एका वृध्द व्यक्तीच्या नावे असलेल्या केडगाव येथील तीन प्लॉटचे परस्पर गहाण खत करून त्यावर नगर अर्बन बँकेच्या केडगाव शाखेतून तीन कोटी रूपयांचे कर्ज घेवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

जयंत मोहनिराज वाघ (वय 75 रा. गुलमोहर अपार्टमेंट, रिध्दी सिध्दी कॉलनी, गुलमोहर रोड, सावेडी) असे फसवणूक झालेल्या वृध्दाचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी (दिनांक 18 एप्रिल) रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचेंगरी! जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO

मंत्रा प्रिंटर्सचे चैतन्य रघुनाथ कुलकर्णी, वाघ यांच्या ऐवजी गहाण खताला उभा राहिलेला तोतया व्यक्ती, तोतया व्यक्तीला गहाण खतात ओळख देणारे, रामदास किसन औताडे (रा. केडगाव), महादेव नंदकुमार लांडगे (रा. परभणी), बोगस कर्ज प्रकरण फाईलमधील बँकेकडे असलेले पहिल्या क्रमांकाचे जामीनदार मच्छिंद्र विश्‍वनाथ पठारे (रा. केडगाव) तसेच बनावट गहाण खत करून देणारे, बँकेच्या केडगाव शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी आनंद विजय बडवे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

राज्यात भाजपला २०२४ मध्ये सुरुंग? ‘त्या’ अहवालाबद्दल विनोद तावडेंचं सूचक ट्वीट

जयंत मोहनिराज वाघ यांनी सन 1970 साली केडगाव येथे गट नं. 512/1/5/1 अ 1 मध्ये जमीन खरेदी केली होती. त्यांनी त्या जमिनीचे एनए करून त्याचे प्लॉट पाडले होते. दिनांक 15 नोव्हेंबर 2019 रोजी वाघ यांना अर्बन बँकेची नोटीस आली त्यात अर्जदार व इतर लोक जामीनदार असून व मंत्रा प्रिंटर्स प्रो प्रा. चैतन्य रघुनाथ कुलकर्णी यांनी सुमारे तीन कोटी रूपये कर्ज घेतलेले असून त्याचे हफ्ते थकित केल्याचे नमूद केलेले होते. म्हणून वाघ यांनी लागलीच नगर अर्बन बँकेच्या केडगाव शाखेत जावून सदर बाबत खात्री केली.

Mission No Pendency म्हणत फडणवीसांकडून कामाची आवराआवर… नव्या चर्चांना उधाण

त्यावेळी वाघ व बँकेच्या निदर्शनात आले की, मंत्रा प्रिंटर्सचे चैतन्य रघुनाथ कुलकर्णी याने वाघ यांच्या ऐवजी कोणीतरी तोतया व्यक्ती उभा करून वाघ यांच्या मालकीच्या प्लॉट नं. दोन (क्षेत्र 1087.00 चौमी), प्लॉट नं. पाच (क्षेत्र 1536 चौमी), प्लॉट नं. सात (क्षेत्र 1075 चौमी) या केडगाव येथील प्लॉट मिळकतीचे गहाण खत दस्त क्र. 4366/2019 दिनांक 16 जुलै, 2019 सह दुय्यम निबंधक वर्ग दोन (पराग बिल्डींग नगर) येथे नोंद केली. वाघ यांची सदरची मिळकत अर्बन बँकेच्या केडगाव शाखा येथे गहाण खताने गहाण ठेवून त्यावर तीन कोटी रूपये रकमेचा बोजा चढवून बँकेकडून तीन कोटी रूपये कर्ज घेवून फसवणूक केल्याचे लक्षात आले.

IMD कडून राज्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट… आरोग्याची ‘या’ पद्धतीने काळजी घ्या आणि सुरक्षित रहा

दरम्यान वाघ यांच्या सदरचा प्रकार लक्ष्यात येताच त्यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग एक यांच्याकडे तक्रार केली. तेथे वेळोवेळी चौकशी होवून वाघ यांच्या बाजूने निकाल लागला आहे. तसेच गहाणखत दस्त क्र. 4366/2019 मधील कागपत्रात दिनांक 6 जुलै, 2019 नगर अर्बन को. ऑफ. बँक ली. नगर यांनी मंत्रा प्रिंन्टर प्रो.प्रा. चैतन्य रघुनाथ कुलकर्णी यांना पत्रात नमुद केलेल्या अटीवर कर्ज मंजुर करण्यात येते आहे.

खोके सरकार नक्की काय लपवतंय? ‘तो’ VIDEO शेअर करत नाना पटोलेंचा सवाल

त्यातील विशेष अट क्र. एकमध्ये नमूद केले आहे की, आपणास नजर गहान कर्ज रक्कम रूपये एक कोटी, कर्ज परतफेड मुदत 01 वर्षे आणि खेळत्या भांडवलासाठी मुदत कर्ज रक्कम रूपये दोन कोटी कर्ज परतफेड मुदत पाच वर्षे, बिन शेती स्थावर मिळकतीचे एकुण मंजुर कर्ज रक्कम रूपये 300 लाख इतके रजिस्टर तारण गहाणखत करून देणेचे अटीवर तसेच दुकानातील व गोडावून मधील प्रिंटींग साहित्य तसेच जॉब वर्क ऑर्डर व व्यवसायातील येणे रक्कमांच्या इत्यादीच्या तारणावर आणि जामीनदार मच्छिंद्र विश्वास पठारे, रामदास किसन औताडे, महादेव नंदकुमार लांडगे, जयंत मोहनिराज वाघ यांचे वयक्तीक जामीनकीवर वर नमुद केले प्रमाणे कर्ज मंजूर केलेले आहे.

Apple ची भारतात धमाकेदार एन्ट्री, मुंबईत उघडलं पहिलं स्टोअर… खासियत जाणून आवक् व्हाल

त्याप्रमाणे सह जिल्हा निबंधक अधिकारी यांनी मंत्रा प्रिंटर्सचे चैतन्य रघुनाथ कुलकर्णी व त्यांना सहाय्य केलेल्या व अर्जदार यांचे जागी उभा केलेल्या तोतया इसमाविरोधात कारवाई करण्याचे नगर अर्बन बँकेस आदेश दिले. पंरतु अद्यापपर्यंत सदर इसमाविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. म्हणुन वाघ यांनी मंगळवारी (दिनांक 18 एप्रिल, 2023) रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या