Friday, April 26, 2024
Homeनाशिकअहिराणी भाषा संवर्धनासाठी पाठपुरावा केला जाईल: निकम

अहिराणी भाषा संवर्धनासाठी पाठपुरावा केला जाईल: निकम

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

खान्देशी अस्मिता असलेल्या अहिराणी भाषेचे संवर्धन (Conservation of Ahirani language) होणे काळाची गरज आहे. जगातील 35 देशात भाषिक वास्तव्य करत असून विश्व अहिराणी संमेलनाने (World Ahirani Conference) मोठा जागर देखील झाला आहे.

- Advertisement -

अहिराणी भाषेचे संवर्धन होण्यासाठी राज्य सरकारकडे (state government) आगामी काळात निश्चित पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम (BJP District President Suresh Nikam) यांनी येथे बोलताना दिली. दरेगाव भागातील पासवान सभागृहात उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे (North Maharashtra Khandesh Development Board) आयोजित बहुभाषिक कवी संमेलन (Poets meeting) व परिसंवाद प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्श न करताना निकम बोलत होते.

व्यासपीठावर विकास मंडळ कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष धर्मा भामरे, कवी संमेलन अध्यक्ष सुरेंद्र टिपरे, स्वागत अध्यक्ष शफिक शेख, संयोजक डॉ .एस. के .पाटील, भिला महाजन, वाय. के. खैरनार, रविराज सोनार आदी उपस्थित होते. भाषा टिकली पाहिजे हे सातत्याने जात असले तरी, प्रत्यक्ष कृतीचा अभाव दिसून येत असल्याची खंत व्यक्त करीत निकम पुढे म्हणाले, ज्याची त्याची भाषा (language) कोणतीही असो मात्र खान्देशची अस्मिता अहिराणी भाषा (Ahirani language) आहे.

अहिराणी भाषेचे मोठ्या प्रमाणात संवर्धन होणे बाबतची जबाबदारी सर्वांचींच राहणार आहे. यामुळे खान्देशच्या अस्मितेचे जतन करण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे आव्हान निकम शेवटी बोलताना केले. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना आगामी काळात नाशिक (nashik) येथे तिसरे विश्व अहिराणी साहित्य संमेलन केले जाणार असल्याची माहिती दिली. तर अहिराणी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी खान्देश वासियांनी व्यापक पुढाकार घेण्याचे आवाहन विकास पाटील यांनी केले.

कवी संमेलनाध्यक्ष गझलकार सुरेंद्र टिपरे कवितेतील बारकावे उलगडून दाखविले. कवितेविषयी बोलताना कवींनी रसिकांना त्यावर बोलू देण्याची गरज असल्याचे टिपरी यांनी सांगत गझल सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी स्वागतध्यक्ष शफिक शेख, धर्मा भामरे, रविराज सोनार, राजेंद्र दिघे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ.एस. के .पाटील यांनी तर सूत्रसंचालन तुषार शिल्लक यांनी केले.

या कार्यक्रमानंतर आयोजित कवी संमेलनात अब्दुल रशीद ,मुस्तफा बरकती, हाफिज अन्सारी, हसराज देसाई ,संतोष कांबळे, सुनील वाघ या कवींनी उर्दू- हिंदीतून तर राजेंद्र पवार, देवदत्त बोरसे, विवेक पाटील, धनंजय पवार ,कैलास भामरे ,अजय बिरारी, सोमदत्त मुजवाडकर, चंद्रकांत ठाकरे ,माधुरी अमृतकर यांनी अहिराणी भाषेतून कविता सादर केल्या. मनीषा येवलेकर, समीना कुरेशी ,उषा श्री ,आबा आहेर, भीला महाजन, यश सोनार, किरण देवरे आदींनी मराठीतून कवितांचे सादरीकरण केले. शेवटी विवेक पाटील यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या