Friday, April 26, 2024
Homeनाशिकसाहित्य संमेलनात अहिराणी जांगडगुत्ता सादर होणार

साहित्य संमेलनात अहिराणी जांगडगुत्ता सादर होणार

मालेगाव । Malegaon (प्रतिनिधी)

नाशिक येथील साहित्य संमेलनात प्रथमच अहिराणी भाषेतील कविता सादर होणार असून अहिराणी जांगडगुत्ता ही तानाजी शिंदे लिखित विनोदी अहिराणी कवितेची निवड झाल्याचे कविकट्टा संपर्क समितीचे किरण सोनार यांनी कळवले आहे.

- Advertisement -

साहित्य संमेलनात देश-विदेशातून 2750 कविता आल्या असून त्यातील विभागानुसार विभागणी करून 486 कवितांची निवड करण्यात आली आहे. नाशिक, धुळे, जळगाव यांचा समावेश खान्देशमध्ये येतो. येथे अहिराणी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते.

याची दखल साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने घेतली असून अहिराणी भाषेच्या काही कवितांची निवड केली आहे. त्यात तानाजी शिंदे यांच्या अहिराणी जांगडगुत्ता कवितेची निवड झाली आहे.

94वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे नाशिक येथे होणार आहे. त्यात स्थानिकांना अहिराणी भाषेतील तानाजी शिंदे लिखित विनोदी व समाजप्रबोधनावरील अहिराणी जांगडगुत्ता ही कविता सादर करण्यात येणार असल्याची माहिती किरण सोनार यांनी दिली.

अहिराणी भाषेला संमेलनात स्थान दिल्याबद्दल व अहिराणी रसिकांना अहिराणी कवितांचे रसग्रहण करता येणार आहे. अहिराणी साहित्यिकांना संधी व व्यासपीठ दिल्याबद्दल 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे सर्वत्र कौतुक व तानाजी शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या