अहमदनगरची पाणीबाणी टळली

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळा धरणावरून साठवण टाकीपर्यंत पाईपलाईनची अदलाबदल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने स्थगित केला आहे. त्यामुळे उद्या मंगळवारपासून (दि.19) शहरावर येवू पाहणारी पाणीबाणी टळली आहे.

मुळा धरणातून पाणी उपसा करणारी पाईपलाईन ही जुनाट आणि कमी व्यासाची असल्याने ती बदलाचा प्रस्ताव समोर आला होता. प्रशासनाने 19 तारखेपर्यंत पाईपलाईन बदलास सुरूवात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा आजपासून आठवंडाभर विस्कळीत होऊन पाणीबाणी लादली जाणार होती. मात्र महापालिकेने सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून त्याचा सविस्तर अहवाल मागविला आहे. हा अहवाल आज सोमवारपर्यंत मिळाला नाही, त्यामुळे पाईपलाईन अदलाबदलीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सविस्तर रिपोर्ट आल्यानंतरच पाईपलाईन बदलाचा निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत हे काम स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख रोहिदास सातपुते यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *