Wednesday, April 24, 2024
Homeनगरअगस्ति विद्यालयात ‘फक्त पाणी’ या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन

अगस्ति विद्यालयात ‘फक्त पाणी’ या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन

अकोले |प्रतिनिधी| Akole

‘फक्त पाणी’ या विषयाला समर्पित ‘फक्त पाणी’ या भित्तिचित्र प्रदर्शनाचे आयोजन अगस्ति विद्यालयात करण्यात आले. इ. 10 वी च्या विद्यार्थ्यानी या प्रदर्शनात पाण्याची उत्पत्ती ते आज त्याच्या अस्तित्वावर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह इथपर्यंतचा मागोवा घेणारी भित्तिचित्रे या निमित्ताने प्रदर्शित केली गेली.

- Advertisement -

अकोले तालुका ते अगदी जगातील महत्त्वाच्या धरणांची माहिती, प्रवरेपासून तर अगदी नाईल अन अमेझॉनचे खोरे याची चित्रांसह सविस्तर माहिती, तालुक्यातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणे, पावसाळ्यात घ्यावयाची काळजी, पृथ्वीतलावरील पाण्याचे विभाजन, सर्वाधिक पावसाची ठिकाणे अशी विस्तृत माहिती या प्रदर्शनात सादर केली गेली. प्रदर्शनातील एकसुरीपणा टाळण्यासाठी पावसावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषेतील कविताही आकर्षकरित्या प्रदर्शित केल्या गेल्या.

या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या प्रा. डॉ. सुरींदर वावळे यांच्या व्याख्यानाने कार्यक्रमाची उंची वाढवली.पाणी या गरजेच्या विषयाला मुलांशी संवाद साधत अगदी सर्वांगी स्पर्श करत त्यांनी पानी संवर्धनाची गरज व्यक्त केली.

अगस्ति एज्युकेशनचे कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी यांनी फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. अगस्तीचे प्राचार्य शिवाजी धुमाळ, पर्यवेक्षक मंगेश खांबेकर, वर्गशिक्षक घनश्याम माने यांनी विद्याथ्यार्ंचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या