Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशशालेय शिक्षणात लवकरच कृषी विषय

शालेय शिक्षणात लवकरच कृषी विषय

नवी दिल्ली | New Delhi –

शालेय शिक्षणात कृषी हा स्वतंत्र विषय अंतर्भूत करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले आहेे.

- Advertisement -

अलिकडील काळात टोळधाडींनी अनेक देशांवर आक्रमण केले. भारतातही झाले, पण ड्रोन्स व इतर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून, टोळधाडीचे आक्रमण यशस्वीपणे परतावून लावण्यात आले, असेही ते म्हणाले. Prime Minister Narendra Modi

झाशी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या आभासी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कृषिक्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना शेतीविषयक पुस्तकी आणि प्रत्यक्ष शिक्षण देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने माध्यमिक शालेय स्तरावर अशाप्रकारचे शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या